Pune Crime: रोज जेवणाला नावं ठेवतो म्हणून रागाच्या भरात पतीवर चाकूने हल्ला, पत्नीवर गुन्हा दाखल
Crime | (File Image)

Pune Crime:  नगरमध्ये काल एका पत्नीने प्रियकरासाठी नवऱ्याची सुपारी देऊन हत्या केली होती ही घटना ताजी असताना, जेवणात नाव ठेवल्याने पत्नीने पतीवर रागाच्या भरात चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. या घटनेअंतर्गत पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने कांदा कापताना रागात पतीवर चाकूने वार केला.  (हेही वाचा- शिवडीत 40 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, पती रोज पत्नीने बनवलेल्या जेवणाची त्रुटी करत असे. त्यामुळे दोघांमध्ये रोज किरकोळ भांडण होत असे, १ फेब्रुवारी रोजी साडेबाराच्या सुमारात पती घरी आल्यानंतर सुध्दा पत्नी जेवण बनवत होती, हे पाहून नवऱ्याला राग आला एवढा रात्री होऊन सुध्दा पत्नी जेवण बनवत होती हे पाहून नवऱ्याला प्रचंज राग आला, अजून जेवण तयार नाही झालं या वरून किरकोळ वाद झाला. भांडणात भांडणात पत्नीने कांदा कापताना, चाकूने पतीच्या हातावर वार केला. या प्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती परिसरात हव्या सारखी पसरली आणि. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नमिता श्रवण माने असं वार करणाऱ्या महिलेचे नाव असून श्रवण माने असं वार झालेल्या पतीचे नाव आहे. परिसरात चौकशी केल्यावर समजले की, दोघें ही वारंवार भांडण करत असे. पुण्यात कौटंबिक वाद दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे दिसून येते.