Mumbai Crime: शिवडीत 40 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला अटक
Arrest | (Representative Image)

Mumbai Crime: मुंबईत एका 40 वर्षीय महिलेच्या हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केले आहे. महिलेचा मृत्यू गेल्या महिन्यात झाला होता. सपना सॅटीस बाथम असं मृत महिलेचे नावा आहे, पोलिसांनी शुक्रवारी शहजादा उर्फ रमजान शेख याला हत्ये प्रकरणी अटक केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- दिल्लीच्या डाबरी येथील घरातून सापडले तीन मृतदेह, श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचा संशय)

मिळालेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीला सपाना हीचा अर्धवट कुजलेला मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात सापडला होता. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यानंतर महिलेची ओळख पटावू म्हणून परिसरात चौकशी केली. मृत महिलेच्या मुलीशी पोलिसांचा संपर्क झाल्यानंतर तीची चौकशी करण्यात आली. मुलीच्या चौकशी एका संशयिताची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली.

संशयित आरोपी शहजादा उर्फ ​​रमजान शेख याची चौकशी केली. शहजादा याच्या चौकशी त्याने हत्येची कबुली दिली.मृत महिलेने शहाजादा याच्याविरोधात २०१८ रोजी तक्रार दाखल केला होता. मृत महिलेच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी पकडले होते. तीन वर्ष आरोपीला जेल झाली होती. जेल मधून बाहेर आल्यापासून आरोपी आणि पीडित महिला एकमेकांच्या संपर्कात होते. तीन वर्षांनी या गोष्टाचा राग मनात भरत महिलेची हत्या केली. पोलिसांनी शहजादावर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेची दगडाने ठेचून हत्या केली होती.