HSBC बँकेच्या 10,000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात; जागतिक मंदीचा फटका
HSBC (Photo Credit: PTI)

जगातील सातव्या क्रमांकाची यशस्वी बँक अशी ओळख असणाऱ्या एचएसबीसी बँकेला (HSBC Bank) सध्या जागतिक मंदीचा (Global Recession) फटका बसल्याची चिन्हे आहे, याचअंतर्गत बँकेचे सीईओ नोएल क्विन (Noel Quinn)व व्यवस्थापकीय मंडळ हे कॉस्ट कटिंगच्या योजनेसाठी बँकेतील 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याच्या विचारात आहेत. बँकेचा खर्च कमी व्हावा यासाठी ही योजना असून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तिसऱ्या तिमाहीच्या परिणामांच्या अहवालाची घोषणा करताना या नोकरकपातीची घोषणा होऊ शकते. फायनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार ही कपात उच्च पदांच्या बाबत होऊ शकते.

प्राप्त माहितीनुसार, एचएसबीसी सीईओ जॉन फ्लिन्ट हे ऑगस्ट महिन्यात पदावरून दूर झाले. यांनतर अध्यक्ष मार्क टकर यांनी बँकेतील आव्हानात्मक समस्यांवर बोलत असताना काही महत्वपूर्ण बदल करण्याची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवले होते. मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन मध्ये सुरु असणाऱ्या वादाचा फटका जागतिक स्तरावर सर्व देशांना बसत आहे. एचएसबीसी व्यवस्थापकीय मंडळ व संचालक वर्गाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने अजूनही कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.

PMC बॅंकेवर RBI चे निर्बंध: जाणून घ्या खातेदार 1000 रूपयांपेक्षा अधिक पैसे का काढू शकणार नाहीत?

दरम्यान, बँक व्यवहार व बेरोजगारीने हा सद्य घडीचा गंभीर प्रश्न आहे. दिवसागणिक वाढणारा बेरोजगारीचा टक्का हा देशाच्या आर्थिक स्थितीस मारक ठरत असल्याने सर्व स्तरावरून सरकारवर जोरदार टीका होत आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी पीएमसी बँक घोटाळा उघडकीस आल्यामुळे बँकेच्या व्यवहाराबाबत नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.