भारतात सध्या नागरिकाची ओळख म्हणून आधार कार्ड (Aadhaar) महत्वाचे कागदपत्र ठरले आहे. तसेच सर्व प्रकारच्या शासकीय कामामध्ये सुद्धा व्यक्तीची ओळख म्हणून आधार कार्ड दाखवावे लागते. मात्र काही वेळेस अशा कागदपत्रांवरील माहिती ही योग्य आहे की नाही हे तपासणे सुद्धा अनिवार्य आहे. त्यासाठी UIDAI ने नवीन एक सुविधा सुरु केली आहे.
या नव्या सुविधेनुसार नागरिकाला रहिवासी पुराव्याशिवाय पत्ता बदलता येणार आहे. आधार कार्डच्या या प्रक्रियेसाठी 30 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकाला तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या पत्त्याच्या आधारे अपडेट करता येणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी आधार कार्ड धारकाला वैधता प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे.(आधार कार्ड पडताळणीसाठी आता भरावा लागणार शुल्क)
परंतु पत्ता अपडेट करण्यासाठी मिळणाऱ्या वैधता प्रमाणपत्रासाठी एक मेसेज आणि लिंक दिली जाईल. त्यानुसार तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठल्यानंतर एक सीक्रेड कोड देण्यात येईल. त्यानंतर तुमचा आधार कार्डवरील पत्ता अपडेट केला जाणार आहे.