Holi Festival: गुजरात मध्ये होळीच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमण्यास बंदी
Representational Image (Photo Credits: File Image)

Holi Festival:  गुजरात सरकारकडून येत्या 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या उत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमण्यास बंदी घातली आहे. तर कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु रंगपंचमी साजरी करण्यापूर्वी 28 मार्चला असणाऱ्या होलिका दहनासाठी फक्त परवानगी दिली गेली आहे. मात्र त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.(देशातील महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगढ आणि गुजरात मध्ये कोरोनाचे दरदिवशी नव्याने 77.44 टक्के रुग्ण आढळत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती)

तर होलिका दहन साजरी करावी पण 29 तारखेला असलेल्या रंगपंचमीचा सण साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी, रहिवाशी इमारत, खुल्या जागी जमतात. मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती असून मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित आल्यास रुग्णांचा आकडा वाढू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, होलिका दहन हे पारंपरिक रित्या पार पाडावे पण त्यावेळी फक्त मोजक्याच नागरिकांची उपस्थिती असावी असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे होलिका दहनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही याची खबरदारी सुद्धा घेणे अनिवार्य असणार आहे. या व्यतिरिक्त कोरोनाच्या नियमांचे सुद्धा पालन करण्यात यावे असे जाहीर करण्यात आलेल्या नोटीस मध्ये जाहीर केले आहे.(COVID-19 Vaccine: मोठा निर्णय, 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे होणार कोरोना लसीकरण; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती)

तर गुजरात सरकारकडून महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांनी कोविड19 चे निगेटिव्ह रिपोर्ट्स सोबत आणण्याचे अनिवार्य केले आहे. तर 72 तासांपूर्वीच्या चाचणीचे रिपोर्ट्स ग्राह्य धरले जाणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातून गुजरात मध्ये आलेल्या बहुतांश जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळेच आता महाराष्ट्रातून गुजरातमध्ये येणाऱ्यांना स्क्रिनिंगला सामोरे जावे लागणार आहे.