हिंदुस्तान यूनिलीव्हर (Hindustan Unilever) या 'फेअर अॅण्ड लव्हली' (Fair & Lovely) क्रीम उत्पादक कंपनीने आपल्या उत्पादनाच्या नावात बदल करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कंपनी आपल्या 'फेअर अॅण्ड लव्हली' या नावातील फेअर (Fair) हा शब्द हटवणार आहे. कंपनीने हा निर्णय गुरुवारी (25 जून 2020) जाहीर केला. कंपनीने याबाबची माहिती देताना म्हटले, 'फेअर अॅण्ड लव्हली' या उत्पादनाच्या नावात बदल केला जात आहे. नवे नाव सर्व मान्यतांनंर लवकरच लॉन्चकरण्यात येईल. अमेरिकेत जॉर्ज फ्लायड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या झाली. त्यानंतर जगभरामध्ये वर्णभेदाविरुद्ध आंदोलन सुरु झाले. दरम्यान, हे उत्पादन रंगभेदाला प्रोत्साहन देत असल्याची टीका कंपनीवर होऊ लागली. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे.
कंपनीने म्हटले आहे की, आम्ही स्किन केअर पोर्टफोलियोसाठी कठीब्ध आहोत. जे सौंदर्याच्या विविधतेचा उत्सव साजरा करते. तसेच, या उत्सवात सर्व प्रकारच्या त्वचेचे रंग सहभागी होतात. त्यामुळे आम्ही उत्पादनाच्या माहितीमधून गोरेपणा आणि लायटनिंग हे शब्द हटवत आहोत. फेअर अॅण्ड लव्हली या ब्राँडचे नाव बदलत आहोत. आम्ही आमची सर्व उत्पादने सर्व स्कीनटोनच्या ग्राहकांसाठी बनवतो. त्यामुळे आम्हाला आमच्या भाषेत बदल करावा वाटतो. आपण नव्या नावासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहितीही कंपीने दिला आहे. (हेही वाचा, लग्नानंतर Priyanka Chopra ने नावात केला 'असा' बदल)
हिदुस्तान युनिलीव्ह ट्विट
We’re committed to a skin care portfolio that's inclusive of all skin tones, celebrating the diversity of beauty. That’s why we’re removing the words ‘fairness’, ‘whitening’ & ‘lightening’ from products, and changing the Fair & Lovely brand name.https://t.co/W3tHn6dHqE
— Unilever #StaySafe (@Unilever) June 25, 2020
हिंदुस्तान यूनिलीवर कंपनीने 1975 मध्ये 'फेयर अॅण्ड लव्हली' नामक एक क्रीम लॉन्च केली. ज्यात चेहरा आणि त्वचेला उजाळा आणि गोरेपणा प्राप्त होईल, असा दावा करण्यात आला होता. उल्लेखनीय असे की, बाजारात उपलब्ध असणाऱ्या गेरेपणा आणि त्वचेला उजाळा देण्याचा दावा करणाऱ्या क्रीममध्ये 50 ते 70 टक्के हिस्सा हा फेअर अॅण्ड लव्हलीकडेच आहे. फेअर अँण्ड लव्हलीने 2016 मध्ये 2000 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. जगभरात वर्णभेदाविरुद्ध लढा सुरु आहे. ज्यामुळे जगभरात वर्णभेदाविरुद्ध आवाज उठतो आहे. यात अनेक भारतीयही सहभागी आहेत.