उत्तर प्रदेशातील तुरुंगात उच्च शिक्षित आणि इंजिनियर्स कैद्यांची संख्या सर्वाधिक; महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात तुरुंगात असलेल्या कैद्यांमध्ये उच्च शिक्षितांची संख्या सर्वाधिक आहे. बहुतांश कैदी उच्च शिक्षित (PG Degrees) किंवा इंजिनियर्स (Engineers) आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau) डेटानुसार, उच्च शिक्षित कैद्यांच्या यादीत महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. या यादीत कर्नाटक (Karnataka) राज्य तिसऱ्या स्थानी आहे. (कोरोना व्हायरस रोखण्यासाठी आता तुरुंगातील कैदी बनवणार मास्क; महाराष्ट्र पोलीस दलाचा अनोखा उपक्रम)

देशातील 3,740 कैद्यांकडे इंजिनियरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा आहे. त्यापैकी 20% म्हणजेच 727 कैदी उत्तर प्रदेशातील तुरुंगात आहेत. महाराष्ट्रातील 495 कैद्यांकडे इंजिनियरींगची पदवी आहे. तर कर्नाटकातील 362 कैदी उच्च शिक्षित आहेत. त्यानंतर तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांचा या यादीत समावेश होतो. देशातील तब्बल 5,282 कैदी उच्च शिक्षित आहेत. तर उत्तर प्रदेश मधील तुरुंगात 2,010 उच्च शिक्षित कैदी आहेत.

महाराष्ट्रासंदर्भात बोलायाचे झाल्यास राज्यातील एकूण 562 कैदी उच्च शिक्षित आहेत. तर कर्नाटकातील 120 कैद्यांकडे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे. एनसीआरबीच्या डेटानुसार, देशभरात 3,30,487 कैदी उच्च शिक्षित आहेत. यापैकी 1.67% पोस्ट ग्रॅज्युएट असून इंजिनियर्सचे प्रमाण 1.2% इतके आहे. उत्तर प्रदेशात शिक्षित कैदी हे बलात्कार आणि हुंडाबळीच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. दरम्यान, कैद्यांच्या कौशल्याला तुरुंगात चांगले प्रोत्साहन दिले जाते. (आणीबाणी 1975-77 काळात तुरुंगवास भोगलेल्यांचे पेन्शन बंद; कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटात महाराष्ट्र सरकारचा निर्णय)

इंजिनियर्स, टेक्निकल शिक्षण झालेल्या कैद्यांच्या ज्ञानाचा उपयोग जेलमधील टेक्नोलॉजी अपग्रेड करण्यासाठी करण्यात येतो. अनेक प्रतिभावान अभियंत्यांनी तुरुंगात ई-जेल मॉड्यूल्स विकसित केले आहेत. तर काही तुरूंगातील यादी यंत्रणेचे संगणकीकरण करण्यास मदत केली आहे. तसंच तुरुंगाच्या आवारात रेडिओ बसवण्याचे महत्त्वपूर्ण काम या उच्च शिक्षित कैद्यांनी केले आहे. अनेक कैदी शिक्षक म्हणून काम करत असून ई-सारक्षता प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले आहेत. अशी माहिती यूपीचे कारागृह महासंचालक आनंद कुमार यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.