Maharashtra Prisoners Making Masks (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे, सर्व शाळा- कॉलेजना सुट्टी आणि शक्य तितक्या अधिक खाजगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम च्या सुविधा देऊन सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण अशा वेळी सुद्धा पोलिसांना कुठलीच सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे साहजिकच इतर वेळेस कोणत्याच मोठ्या संकटाला न घाबरणारे, नागरिकांच्या रक्षणासाठी 24 तास ऑन ड्युटी तैनात असणारे पोलीस कर्मचारी मात्र आता या व्हायरस मुळे चिंतीत होते. या त्यांच्या चिंतेवर आता त्यांनी स्वतःच उत्तर शोधून काढले आहे. प्राप्त माहितीनुसार ड्युटी वर असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी खास पद्धतीचे मास्क बनवण्यात येणार आहेत, आणि विशेष म्हणजे या मास्कची निर्मिती करण्यासाठी राज्यातील तब्बल 1 हजार कैद्यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police)  या उपक्रमाविषयी जाणून घ्या.. Coronavirus: लडाख मधील भारतीय सैन्य दलाच्या जवानाला वडिलांसहित कोरोना ची लागण

महाराष्ट्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी व ड्युटी असताना लागणारे मास्क बनवण्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्यातील सुमारे 1 हजार कैद्यांवर सोपवण्यात आली आहे, याबाबत महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून माहिती देण्यात आली. राज्यातील 9  तुरुंगात असणाऱ्या 1  हजार कैद्यांकडून तब्बल 1  लाख मास्क बनवून घेतले जात आहेत . हेच मास्क पोलीस, कैदी व राज्य सरकारच्या अनेक विभागातील कर्मचारी वापरतील असा हा उपक्रम आहे. सद्य घडीला बाजारात मास्कची वाढती मागणी पाहता तुरुंगातील कैद्यांचा वापर करून अशा प्रकारचे महत्वपूर्ण काम करवून घेतले जात आहे. Coronavirus: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही, मुंबई लोकलही सुरु राहणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पहा महाराष्ट्र पोलीस ट्विट

दरम्यान, पोलीस वर्गातील अनेक कर्मचारी हे संसर्गित भागातही त्याच हुरूपाने कार्यरत आहेत त्यामुळे त्यांच्या आरोग्याची दक्षता बाळगणे हे देखील महत्वाचे आहे. मास्क आणि सॅनिटायजर पुरवण्याच्या माध्यमातून याबाबत प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या राज्यात तब्बल 42 कोरोना ग्रसित रुग्ण आढळले आहेत.