
गलवान खोऱ्यामध्ये (Galwan Valley) चीनच्या सैन्याशी झालेल्या हिंसक झटापटीनंतर मोदी सरकारने डिजिटल स्ट्राइक करत, 59 चिनी अॅप बंद केले आहेत. त्याआधी पासूनच चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. आता देशातील प्रसिद्ध ‘हिरो सायकल’ (Hero Cycles) नेही चीनला मोठा झटका दिला आहे. हीरो सायकलचे एमडी पंकज मुंजाल (Pankaj Munjal) यांनी चीनबरोबरचा 900 कोटींचा व्यवसाय रद्द करण्याचे म्हटले आहे. मुंजाल यांची ही घोषणाला थेट चीनवर ट्रेड स्ट्राइक मानली जात आहे. हिरो सायकलचे नाव लुधियानाच्या मोठ्या कंपन्यांमध्ये घेतले जाते. कंपनी येत्या 3 महिन्यांमध्ये चीनशी 900 कोटींचा व्यवहार करण्यार होती, मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेत, तो आता रद्द करण्यात आला आहे.
एमडी पंकज मुंजाल म्हणाले. ‘दरवर्षी आम्ही चीनसोबत 300 कोटी रुपयांचा व्यवसाय करतो, त्यांच्याशी तीन किंवा चार वर्षाचा करार केला जातो. यावेळी, 900 कोटींची ऑर्डर चीनला देण्यात आली होती व आता हीरोने ती रद्द केली आहे. त्यानंतर आता हे पार्टस जर्मनीमध्ये तयार केले जातील.’ कोविड-19 दरम्यान जर्मनीत त्यांची डिझाईन्स तयार केली गेली आहेत. दुसरीकडे लुधियानामध्ये बऱ्याच लहान कंपन्या सायकलचे भाग बनवितात व आता हीरो सायकल अशा कंपन्यांचा मदतीसाठी पुढे आली आहे. हिरो सायकल स्वतःमध्ये विलीन होण्यासाठी अशा लहान कंपन्यांना ऑफर देत आहे.
(हेही वाचा: India-China border Tension:तर महागात पडेल; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला लद्दाख प्रश्नी इशारा)
कोरोना विषाणूच्या सावटामुळे सध्या जिम बंद आहेत, ज्यामुळे पूर्वीपेक्षा आता सायकलीची मागणी वाढली आहे आणि म्हणूनच हीरो सायकलनेही त्यांची क्षमता वाढविली आहे. मुंजाळ म्हणाले की, हीरो सायकल आता जर्मनीमध्ये आपला प्रकल्प स्थापित करणार आहे. या संयंत्रातून हीरोच्या सायकली युरोपमध्ये पुरविल्या जातील.