Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Olichel/Pixabay)

Health Care:  आपण बाहेर गेलो आणि  तहान लागली आपण साधारणे एखादी प्लास्टिकची  बॉटल खरेदी करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे हे आरोग्यासाठी घातक असते. यामागे काही कारणे सुद्धा आहेत. त्याबद्दलच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. बिस्फेनॉल ए, अर्थात बीपीए, बाटल्या बनवण्यासाठी वापरलेले एक केमिकल आहे आणि यामुळे सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. भारतात वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या बाटल्या तयार करताना बायफेनॉल ए चा वापर पूर्णपणे निषिद्ध नाही.

बिस्फेनॉल ए, अर्थात बीपीए, बाटल्या बनवण्यासाठी वापरलेले एक केमिकल आहे आणि यामुळे सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. प्लास्टिकच्या बाटल्यांचा सतत वापर केल्याने हृदयाची समस्या, मेंदूचे नुकसान, मधुमेह आणि गर्भधारणामध्ये समस्या यासारख्या समस्या उद्भवतात. अशा स्थितीत, आरोग्यासाठी आपण प्लास्टिकच्या बाटल्या वापरणे थांबविणे महत्वाचे आहे.

कर्करोगाचा धोका - प्लास्टिकच्या बाटल्यामुले कर्करोग होण्याचा धोका असू शकतो. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, जेव्हा तपमान किंवा सूर्यप्रकाशामुळे बाटली गरम होते, तेव्हा त्याच्या प्लास्टिकमधून डाई ऑक्सिनचा स्राव सुरू होतो. हे डाई ऑक्सिन आपल्या शरीरात विरघळते आणि पेशींचे नुकसान करते. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होतो.(झोपायच्या आधी पिस्ता खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? जाणून घ्या अधिक)

मेंदूसाठी हानिकारक - बिस्फेनॉल ए, अर्थात बीपीए, प्लास्टिक बनवण्यासाठी वापरला जातो, ज्याचा मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे माणसाची स्मरणशक्ती आणि समजण्याची क्षमता कमकुवत होते. एका संशोधनात असे आढळले आहे की प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या

बीपीएमुळे अल्झायमरचा धोकाही वाढतो.

प्रजननक्षमतेवर परिणाम होतो - बीपीए केवळ मेंदूसाठी हानिकारक नाही. यामुळे, महिला आणि पुरुष दोन्हीमध्ये गुणसूत्रांची संख्या कमी आहे. यामुळे शुक्राणू आणि अंडी दोन्ही प्रभावित होतात. अशा परिस्थितीत प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणे टाळा.

गर्भवती महिलांसाठी - प्लास्टिकमध्ये उपस्थित बीपीए न जन्मलेल्या मुलाच्या (गर्भात असल्येल्या) विकासास प्रभावित करते. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान महिलांना प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो.

हृदयरोगासाठी कारणीभूत - बीपीए रसायने प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिऊन रक्तप्रवाहात प्रवेश करतात. अशा परिस्थितीत ते हृदय कमकुवत करते. याचा परिणाम शरीरातील रक्ताभिसरणांवरही होतो.