HDFC बँकेकडून FD वरील व्याजदरात कपात, जाणून घ्या नवे दर
HDFC (Photo Credit: PTI)

एचडीएफसी (HDFC) बँकेकडून फिक्स डिपॉझिटवरील व्याजदारत कपात करण्यात आली आहे. तर कपात केलेले व्याजदर 16 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आले असून त्याबाबत अधिक माहिती बँकेकडून ग्राहकांना देण्यात आली आहे. एचडीएफसीमध्ये सात दिवसे ते 14 दिवसांच्या कालावधीसाठी 3.50 टक्के व्याजदर ठेवण्यात आला आहे. तसेच 15-19 दिवसांसाठी एफडीसाठी 4%, 30-45 दिवसांसाठी 4.90% व्याजदर दिला जात आहे. त्याचसोबत 46 दिवस ते 6 महिन्यांसाठी ठेवण्यात आलेल्या एफडीवर 5.40 टक्के व्याज ग्राहकांना मिळणार आहे.

ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर बँकने व्याजदरात 0.15 टक्क्यांनी कपात केली आहे. आता 1 वर्षासाठी ठेवण्यात आलेल्या एफडीवर 6.30 टक्के रिर्टन मिळणार आहे. एक वर्ष आणि एक दिवस ते एका वर्षासाठीच्या एफडीवर व्याजदर 0.15 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना 6.30 टक्के व्याज मिळणार आहे.  तर जाणून घ्या एचडीएफसीचे एफडीवरील नवे व्याजदर.(जीएसटी रिटर्न न भरल्यास होणार कारवाई; पुढील आठवड्यात निघणार अधिसूचना?)

कालावधी व्याजदर 
7 दिवस - 14 दिवस  3.50%
15 दिवस - 29 दिवस  4%
30 दिवस - 45 दिवस  4.90%
46 दिवस - 60 दिवस  5.40%
61 दिवस -90 दिवस  5.40%
91 दिवस - 6 महिने 5.40%
6 महिने - 9 महिने 5.80%
9 महिने - 1 वर्ष ते 1 दिवस कमी  6.05%

त्याचसोबत दोन वर्ष ते पाच वर्षांसाठी एफडीवरील व्याजदरात 0.15 टक्के कपात केली आहे. त्यामुळे आता 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षापर्यंतच्या कालावधीत एफडीवर 6.40% टक्के व्याजदर मिळणार आहे. तर 3 वर्ष ते 5 वर्षासाठीच्या एफडीवर ग्राहकांना 6.30 टक्के व्याजदर झाला आहे. सिनियर सिटिझन्स बाबत बोलायचे झाल्यास त्यांना 0.50% टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे. तसेच सात दिवस ते 10 वर्षासाठी बँकेकडून 4 ते 6.90 टक्के व्याज दिला जातो.