Madras High Court (PC- wikimedia Commons)

घटस्फोटाची (Divorce) मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) महत्त्वपूर्ण निकाल देताना म्हटले आहे की, पत्नीने एकट्यात पॉर्न (Porn) पाहणे आणि हस्तमैथुन (Masturbation) करणे हे पतीपासून घटस्फोटाचे कारण असू शकत नाही. हिंदू विवाह कायद्यांतर्गत, पत्नीच्या अशा कृत्याचा जोपर्यंत वैवाहिक संबंधांवर स्पष्टपणे परिणाम  होत नाही, तोपर्यंत ही पतीशी क्रूरता ठरणार नाही. हे प्रकरण पती (अपीलकर्ता) आणि पत्नी (प्रतिवादी) यांच्यातील वैवाहिक विवादाशी संबंधित आहे. दोघांचा विवाह 1 जुलै 2018 रोजी अरुलमिघू पशुपतेश्वर मंदिर, करूर येथे झाला. मात्र, ते 9 डिसेंबर 2020 पासून वेगळे राहत होते.

पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला, ज्यामध्ये दोन प्रमुख आरोप होते- पत्नीला लैंगिक संबंधातून पसरणारे आजार (वेनेरिअल डिसीज) आहे. तसेच तिच्या काही सवयी जसे की पॉर्न पाहणे, हस्तमैथुन करणे, घरातील कामे टाळणे, सासरच्या लोकांशी गैरवर्तन करणे आणि मोबाईल फोनचा अतिवापर करणे या क्रौर्याच्या कक्षेत येतात. मात्र, करूरच्या कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली आणि वैवाहिक हक्क बहाल करण्याची पत्नीची याचिका मान्य केली. त्यामुळे नाराज झालेल्या पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली.

यावर न्यायालयाने म्हटले, एखाद्या व्यक्तीवर लैंगिक आजार असल्याचा आरोप करणे ही गंभीर बाब असून, ती ठोस पुराव्यांनिशी सिद्ध करणे आवश्यक आहे. यावेळी पती पत्नीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल सादर करू शकला नाही. न्यायालयाने पुढे नमूद केले, एखाद्या व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासले आहे हे केवळ घटस्फोटाचे कारण असू शकत नाही. हे कोणत्याही अनैतिक वर्तनाचे परिणाम नसून ते काही अन्य कारणांमुळे आहे हे सिद्ध करण्याची संधी संबंधित पक्षाला दिली पाहिजे. पतीने पत्नीची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणीही केली नाही, त्यामुळे न्यायालयाने हा आरोप निराधार मानून फेटाळला. (हेही वाचा: HC on Attempt to Rape Case: 'अल्पवयीन मुलीचे गुप्तांग पकडणे, तिच्या पायजम्याची नाडी काढणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही'; Allahabad High Court ची टिपण्णी)

पॉर्नबाबत न्यायालयाने म्हटले की, जर एखादी व्यक्ती खाजगीत पॉर्न पाहत असेल, तर ते बेकायदेशीर असल्याशिवाय (जसे की चाइल्ड पोर्नोग्राफी) तो गुन्हा किंवा क्रूरता मानता येणार नाही. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, खाजगीत पॉर्न पाहणे भारतीय कायद्यानुसार दंडनीय नाही. तसेच हस्तमैथुन जेव्हा पुरुषांमध्ये हस्तमैथुन सामान्य मानले जाते, तेव्हा स्त्रियांच्या प्रथेला कलंक वाटू नये. कोर्टाने स्पष्ट केले की, पत्नीचे हस्तमैथुन करणे हा देखील गुन्हा नाही. मात्र जर पत्नी पॉर्न पाहत असेल, हस्तमैथुन करत असेल आणि त्यामुळे आपली वैवाहिक कर्तव्ये पार पडत शकत नसेल, तर ती क्रूरता ठरू शकते. परंतु या प्रकरणात पत्नीने तिच्या वैवाहिक कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. त्यानंतर न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली.