सोनिपथ (Sonipat) येथील विद्यापीठात बीबीएच्या विद्यार्थ्याचा (BBA Student) संशयास्पद मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचे नाव संस्कार चतुर्वेदी असे आहे. तो 19 वर्षांचा होता. आगोदरच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मृत्यबद्दल संस्कार चतुर्वेदीच्या पालिकांनी केलेल्या आरोपांमुळे सनसनाटी निर्माण झाली आहे. पाठिमागील अनेक दिवसांपासून संस्कार याच्यावर रॅगींग (Ragging) होत असे. रॅगींगच्या नावाखाली त्याचा छळ केला जात असे. त्यामुळे तो सातत्याने निराश होता. पाठिमागील काही दिवसांपासून तो अधिकच नैराश्येत होता, असा आरोप संस्कारच्या कुटुंबीयांनी केला आहे. विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी संस्कारच्या मृत्यूची दखल घेतली आहे. या प्रकरमाचा सर्व बाजूंनी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
संस्कार चतुर्वेदी हा मुळचा गुजरातमधील बडोदा शहरातील राहणारा आहे. ओपी जिंदल विद्यापीठ (O.P. Jindal University), सोनिपथ येथे तो बिझनेस एडमिनिस्ट्रेशनचा या क्षेत्रातील शिक्षण घेत होता. विद्यापीठाच्याच आवारात एके दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. संस्कारच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तसेच, पोलिसांनी संस्कारचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी सोनीपतच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. (हेही वाचा, कुटुंबातील सदस्याच्या मृत्युनंतर महिलांची कापली जातात बोटे; अंगावर काटा अनेक 'या' समाजातील अशी कु-प्रथा)
संस्कारचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्यापतरी माहिती मिळू शकली नाही. त्याच्या मृत्यूचे प्राथमिक कारणही अद्याप स्पष्ट झाले नाही. तरीही पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहे. दरम्यान, त्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या या प्रकरणात दाखल तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना संस्कारच्या चुलतभावाने सांगितले की, त्याच्या मृत्यूबद्दल कोणालाच निटसे सांगता येत नाही. मृत्यूपर्वी काही काळ त्याच्याशी बोलणे झाले होते. तेव्हा तो काहीसा तणावत जाणवत होता. तणावाचे नेमके कारण त्याने सांगितले नाही. पण तो तणावात जाणवत होता, अशी माहिती चुलतभावाने दिली.