हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. आता आठ तारखेला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी सर्व एक्झिट पोल जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी युती आणि हरियाणामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत.
याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांना विचारण्यात आले की, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये सरकार कोण बनवेल, यावर ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) सरकार स्थापन करेल. त्याचबरोबर हरियाणाबाबत ते म्हणाले की, हरियाणावर बोलण्यास मनाई आहे. (हेही वाचा - Haryana Exit Poll Result 2024 Live: हरियाणामध्ये काँग्रेस स्थापन करु शकते सरकार, एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे समोर )
पाहा व्हिडिओ -
VIDEO | Jammu and Kashmir elections 2024: “I can see that (BJP) government will be formed in Jammu and Kashmir,” says BJP leader Brij Bhushan Sharan Singh.
(Full video available on PTI Videos- https://t.co/dv5TRARJn4) pic.twitter.com/MOC3wKvNks
— Press Trust of India (@PTI_News) October 6, 2024
ब्रिजभूषणने विनेश आणि बजरंगवर केली होती टीका
भाजपने ब्रिजभूषण शरण सिंह यांना कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याविरोधात वक्तव्य करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. कारण त्यांनी दोन्ही कुस्तीपटूंना काँग्रेसमध्ये जाण्यावरून टार्गेट केले होते. माजी डब्ल्यूएफआय प्रमुख म्हणाले की, विनेश आणि बजरंग यांनी कुस्तीमध्ये नाव कमावले आणि त्यातून प्रसिद्ध झाले, पण आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे नाव पुसले जाईल. यासोबतच ब्रिजभूषण यांनी विनेशवर कुस्तीला बदनाम केल्याचा आरोप केला.