Kumbh Mela (Photo Credits-Twitter)

Haridwar Kumbh Mela 2021:  केंद्र सरकारने हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे भाविकांना कुंभ मेळ्यामध्ये येण्यापूर्वी नोंदणी करणे अत्यावश्यक असणार आहे. त्याचसोबत सामुदायिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय किंवा मेडिकल कॉलेज मधून वैद्यकिय दाखला घेऊन येणे अनिवार्य असणार आहे. केंद्र सरकारचे असे म्हणणे आहे की, कुंभ मेळ्यासाठी देशातील विविध राज्याव्यतिरिक्त विदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळेच सावधानी बाळगणे अत्यावश्यक आहे.

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी असे म्हटले की, सरकार दिव्य-भव्य आणि सुरक्षित कुंभ आयोजित करण्यासाठी तयार आहोत. मार्गदर्शक सुचनांनुसार, कुंभ मेळ्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, मेळा हा पू्र्णपणे पद्धतशीर रितीने पार पाडला जाणार आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम असून त्याच्या नव्या रुपातील स्ट्रेनमुळे अधिक भीती व्यक्त केली जात आहे. अशातच भाविकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे सरकारची जबाबदारी आहे.(Republic Day Parade 2021: यंदा भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन; परेड वेळ, ठिकाण यासह जाणून घ्या कुठे पाहाल Live)

Tweet:

एसओपीनुसार, सर्व व्यवस्थांबद्दल अधिकाऱ्यांना निर्देशन दिले गेले आहेत. कुंभ मेळ्यात भाविकांना स्वच्छता, अध्यात्म, उत्तराखंडाची लोक संस्कृती आणि परंपरांचा एकत्रित मेळ पहायला मिळणार आहे. वॉल पेटिंग, लाइट शो मुळे भाविकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री मैदान कौशिक यांनी असे म्हटले की, कुंभाचे आयोजन पूर्ण उत्साह आणि उमंगासह केले जाणार आहे.