Happy New Year 2019 Greetings: पंतप्रधान Narendra Modi पासून Rahul Gandhi पर्यंत अनेक नेत्यांनी देशवासियांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!
Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: PTI)

Happy New Year 2019 Greetings : नववर्षात पर्दापण केल्यानंतर नववर्षाच्या शुभेच्छा फक्त सर्वसामान्यांनीच नव्हे तर दिग्गज मंडळीही दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Congress President Rahul Gandhi) आणि इतर दिग्गज मंडळींनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "सर्वांना 2019 नवर्षाच्या आनंददायी शुभेच्छा. सर्व आरोग्यदायी आणि आनंदी राहो. तुमच्या सर्व इच्छा 2019 मध्ये पूर्ण होवोत, अशी मी प्रार्थना करतो," असे ट्विट मोदींनी केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील शुभेच्छा देण्यासाठी खास ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, "सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. 2019 तुमच्या कुटुंबियांसाठी, देशासाठी आणि आपल्या सुंदर पृथ्वीसाठी आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो."

उपराष्ट्रपती वेकंट नायडू यांनीही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. "2019 ची सुरुवात आनंददायी आहे. आपण सर्वांनी मिळून शांततापूर्ण, समृद्ध, समावेशक जगाची निर्मिती करुया."

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनीही नववर्षानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. "तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नववर्षाच्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंददायी जावो. हे वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो, असे सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे."

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही देशवासियांना नवर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले की, "तुमच्या सहयोगासाठी धन्यवाद. भारतीय रेल्वे प्रशासन तुमचे आयुष्य अधिक सुकर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. नविन भारताच्या निर्मितीच्या आमच्या प्रयत्नात 2019 मध्ये तुम्हीही सहभागी व्हा."