Gurugram Namaz Controversy: गुरुद्वारा सिंह सभेत नमाज पठणास नकार, शीख समुदायातील काही लोकांचा निर्णयाला विरोध
Muslim delegation at the Sadar Bazar Gurudwara (Photo Credits: Twitter)

Gurugram Namaz Controversy:  हरियाणातील गुरग्राम येथे शुक्रवारी गुरुद्वारा सिंह सभेत नमाज पठण झाले नाही. तसेच शीख समुदायातील काही सदस्यांनी तेथे मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्याची परवानगी दिली यामुळे धर्मस्थळाच्या प्रबंधन समितीच्या या निर्णयाचा विरोध केला. या लोकांनी म्हटले की, जर गुरुद्वारा प्रबंधन समितीने गुरुद्वाराच्या परिसरात नमाज अदा करण्याची परवानगी दिल्यास तर ते यासाठी विरोध करतील.(Chandrababu Naidu Breaks Down: टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना पत्नीवरील टीकेमुळे अश्रू अनावर, सत्ताप्राप्तीशिवाय विधानसभेत प्रवेश न करण्याची घेतली शपथ)

संयुक्त संघर्ष समितीचे सदस्य दुपारी 12 वाजता गुरुद्वारात पोहचले आणि काही लोकांना गुरु तेग बहादुर-हिंद की चादर नावाची पुस्तके दिली. ही लोक दुपारी दोन वाजेपर्यंत तेथेच होते आणि विरोध करतच होते. दुसऱ्या बाजूला मुस्लिम समुदायातीच्या प्रतिनिधींनी सणावर कोणतेही सावट येऊ नये म्हणून गुरुद्वारात नमाज अदा न करण्याचा निर्णय घेतला.

गुरुद्वारा कमिटीचे मेंबर दया सिंह यांनी म्हटले की, समितीने नमाजासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला होता. कारण मुस्लिमांना काही समस्यांचा सामना करावा लागत होता. आम्ही त्यांना नमाज अदा करण्यास देऊ. गुरुपर्वच्या कारणास्तव मुस्लिमांनी कोणत्याही संघर्षापासून बचाव करण्यासाठी स्वत: नमाज अदा करणार नाहीत असा निर्णय घेतला. आम्ही पुढील आठवड्यात नमाजासंबंधित अखेरचा निर्णय घेऊ.(देशभरात काँग्रेसकडून आज 'शेतकरी विजय दिवस' साजरा, कार्यकर्त्यांना विजयी रॅली काढण्याचे निर्देश)

Tweet:

दया सिंह यांनी असे ही म्हटले की, आम्ही जुम्माच्या नमाजासाठी शाळा आणि गुरुद्वाराच्या बेसमेंटमध्ये एका मोकळ्या ठिकाणचा प्रस्ताव दिला होता. मात्र मुस्लिम बांधवांनी नमाज अदा न करण्याचा निर्णय घेतला. तर गुरुपर्वाच्या निमित्ताने त्यांना कोणताही वाद त्यांना नको होता.जमियत उलेमा हिंद, गुरुग्रामचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद सलीम आणि गुरुग्राम मुस्लिम कौन्सिलचे सह-संस्थापक अल्ताफ अहमद यांच्यासह एका शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी समितीच्या सदस्यांची शांतता आणि सद्भावना वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानले.

>>काय आहे वाद? 

गुरुग्राम प्रशासनाने यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या आक्षेपांचा हवाला देऊन शहरातील 37 सार्वजनिक मैदानांपैकी आठ ठिकाणी शुक्रवारची नमाज अदा करण्याची परवानगी रद्द केली होती. संयुक्त हिंदू संघर्ष समितीचे कायदे सल्लागार कुलभूषण भारद्वाज यांनी म्हटले की, गुरु तेग बहादुर हिंद चादर नावाची 2500 पुस्तकांचे वितरण केले आणि गुरु नानक देव यांना श्रद्धांजली वाहिली.

त्यांनी पुढे असे सांगितले की, आम्ही तिथे नमाजासाठी आमची जागा देण्याच्या गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी गेलो नव्हतो. आम्ही कॅम्पसमध्ये नमाज अदा करणार्‍या कोणाच्याही विरोधात नाही, मग तो कोणत्याही समुदायाचा असो. सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्याच्या प्रथेला आमचा विरोध आहे. यावर आमचा कोणताही आक्षेप नाही.