74 Year women give birth to twins child girl (Photo Credits-ANI)

सध्या मुलांना जन्म देण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा शोध लागला आहे. त्यामुळे आता तंत्रज्ञानाच्या मदतीने महिलेवर उपचार करुन  गर्भवती होण्यासाठी काही पद्धतींचा वापरण्यात येत आहे. तर गुंटूर (Guntur) येथे एका 74 वर्षीय महिलेने अहिल्या रुग्णालयातील डॉक्टरांना तिला मुलांना जन्म द्यायचा आहे असे जानेवारी महिन्यात सांगितले होते.

त्यानुसार महिलेवर IVF पद्धतीने उपचार करण्यात आले. या उपचारासाठी महिलेला डोनरकडून अंडकोश आणि नवऱ्याचे स्पम वापरण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टर उमाशंकर यांनी दिली आहे. त्यानंतर आज या 74 वर्षीय महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.(आश्चर्यम! एक वर्षात अनेक महिला तब्बल 8 वेळा प्रसूत; पोलीसही अवाक, SBI ने सुरु केला तपास)

ANI ट्वीट: 

तर दोन्ही मुली उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र जुळ्यांना जन्म दिलेल्या महिलेचे प्रकृती चिंताजनक असून तिला अतिदक्षता विभागात प्रसुतीनंतर हलवण्यात आले आहे.