गुजरात: पाकिस्तानी कमांडोची कच्छमध्ये घुसखोरी, नौदलाला हाय अलर्ट जाहीर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पाकिस्तानी (Pakistan) कमांडो आता समुद्राच्या माध्यमातून दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हाय अलर्ट जाहीर करण्यात आले असून नौदलासह सतर्क राहण्यास सांगितले आहे. गुप्तचर यंत्रणेकडून गुजरात (Gujrat) मधील कांदला बंदरगाह येथील सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. नौदलाच्या मते पाकिस्तानी कमांडो गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला किंवा जातीवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न करु शकतात. तसेच समुद्राच्या मार्गे कच्छ क्षेत्रातून भारतात घुसखोरी करत हल्ला करु शकतात.

नौदल प्रमुक एडमिरल करमबीर सिंह यांनी असे म्हटले होते की, पाकिस्तानामधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद त्यांच्यामधील लोकांना समुद्रामार्गे हल्ला करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. मात्र नौदल दहशतवाद्यांचे हे सर्व प्रयत्न मोडीत काढू काढण्यासाठी पूर्ण तयार असल्याचे म्हटले आहे.(CRPF च्या क्रमांकावर फोन करुन पाकिस्तानी नागरिक करतायत शिवीगाळ, गेल्या 6 दिवसात 7 हजार फोन कॉल्स)

ANI ट्वीट: 

तर पाकिस्तान जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर संतापला आहे. त्यामुळेच जम्मू-कश्मीरच्या सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या माध्यमातून तेथे हल्ला करत आहेत. मात्र दहशतवाद्यांच्या या हल्ल्याचे भारतीय जवानांकडून प्रतिउत्तर वेळोवेळी दिले जात आहे.