CRPF च्या क्रमांकावर फोन करुन पाकिस्तानी नागरिक करतायत शिवीगाळ, गेल्या 6 दिवसात 7 हजार फोन कॉल्स
Image For Representation (Photo Credits-Facebook)

काश्मीर (Kashmir) येथे सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सीआरपीएफकडून (CRPF) एक हेल्पाईन क्रमांक सुरु करण्यात आला. मात्र पाकिस्तानी (Pakistani) नागरिक या हेल्पलाइन क्रमांवर फोन करुन शिवीगाळ करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हेल्पलाइनवर आलेले हे फोन कॉल्स 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान आले असून त्यामध्ये 171 फोन हे भारताबाहेरचे असल्याची बाब समोर आली आहे. तसेच गेल्या 6 दिवसातील फोन कॉल्स तपासून पाहिले असता त्याची संख्या 7 हजारापेक्षा अधिक आहे. सीआरपीएफच्या क्रमांकावर फोन करत संतापलेल्या पाकिस्तानने सुरक्षा बलाच्या जवानांना अत्यंत वाईट अपशब्द वापरले आहेत.

हेल्पालाइन क्रमांकावर 2,700 फोन कॉल्स हे सुरक्षा बलाच्या परिवारातून आले होते. तर 2448 कॉल्स हे काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या लोकांनी केले होते. 1752 कॉल्स हे काश्मीरचा हिस्सा नसलेल्या नागरिकांनी केले होते. जम्मू-काश्मीरच्या एका वरिष्ठ पोलिसांना टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तात असे सांगितले की, पाकिस्तानी क्रमांकावरुन सुद्धा आम्हाला काही फोन कॉल्स आले होते. त्यामधील बहुतांश पाकिस्तानी लोकांनी या क्रमांकावर शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.(पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर संयम बाळगावा, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला)

काश्मीर येथे राहणाऱ्या नागरिकाला बाहेरुन फोन कॉल्स आल्यास प्रथम सीआरपीएफचे जवान त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांची विचारपुस केल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीला खुशाली कळवतो. मात्र या क्रमांकावर आता शिवीगाळ होत असल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच परिवारातील सदस्यांची खुशाली ऐकून झाल्यावर पाकिस्तानी नागरिकांनी उलट जवानांनाच शिवीगाळ केली आहे.