अहमदाबाद: अम्युझमेंट पार्कमधील झोपाळा तुटल्याने 3 जाणांचा मृत्यू तर 26 जण जखमी
Ahmedabad: Adventure Park (Photo Credits-ANI)

गुजरात (Gujrat) मधील अहमदाबाद (Ahamadabad) येथे एका अम्युझमेंट पार्कमधील झोपाळा तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 जणांसह 26 जण जखमी झाले आहेत. झोपाळा अचानक तुटल्याने ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. अहमदाबाद येथील कांकरिया अम्युझमेंट पार्कमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा तेथे उपस्थिक असलेल्या लोकांनी असे म्हटले आहे की, जॉय राइट्स म्हणून ओळखळा जाणारा झोपाळा अचानक तुटून खाली पडला. या प्रकरणी जवळजवळ 26 जण जखमी झाले असून 3 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

(धक्कादायक! साडेचार किलोचा मुलगा जन्मला म्हणून नर्सची बाळंतीण महिलेला मारहाण; निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू)

दुर्घटना झालेल्या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने तेथे धाव घेतली. तर जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झोपाळा तुटला त्यावेळी त्यामध्ये 31 जण बसले होते. त्यापैकी 15 जणांचा गंभीर दुखापत झाली आहे.