Gujarat Shocker: गुजरात मधील जुनागढ येथे एका 23 वर्षीय गर्भवती महिलेची लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या पार्टनरकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव उर्मिला सोलंकी असल्याचे सांगण्यात आले आहे. भावनाथ तलेठी परिसरात ही सदर घटना घडली आहे. पोलिसांकडून 32 वर्षीय मनसुख उर्फ टीनो जाधव याला शनिवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली.(Shocking! 8 महिन्यांचा बाळाला मारले-झोडपले, जमिनीवर आपटले; केअरटेकरचे धक्कादायक कृत्य, मुलाचे ब्रेन हॅमरेज)
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, जाधव सोबत महिलेचे गेल्या 10 वर्षापासून नातेसंबंध होते. ते दोघे राजकोट येथे जवळजवळ चार वर्ष एकत्रित लिव्ह इन मध्ये राहत होते. महिलेचा मृतदेह 10 फूट खाली पुरला गेला होता आणि तिचा डावा हात बेपत्ता होता. पोलिसांच्या मते, जंगलातील जनावरांकडून तो हात खाल्ला गेला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला.
संशयित जाधव आणि उर्मिला यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरुन भांडण झाली होती. तसेच आरोपीकडून उर्मिला हिच्यावर बाळासाठी गर्भपात करण्याचा दबाब टाकला जात होता. जाधव याला यापुर्वी सुद्धा त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली होती. भावना सोलंकी हिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.
भावना यांनी असे म्हटले की, उर्मिला तीन-चार महिन्यांची गर्भवती असताना आमच्याकडे राहण्यासाठी आली होती. 8 फेब्रुवारीला आरोपी त्यांच्याकडे आला आणि उर्मिला हिला त्याच्यासोबत अलिगढ येथे घेऊन गेला. त्यावेळी भावना यांनी उर्मिला हिला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तो बंद लागला. तसेच जाधव याच्याशी सुद्धा कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
रिपोर्ट्नुसार, उर्मिला हिची बहिण काजल ही जाधव याला राजकोट येथील महापालिकेच्या रुग्णालयात भेटली. त्याने काजलला असे सांगितले की, ती लवकरच घरी येईल. पण उर्मिला घरी आली नाही तेव्हा तिच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. जाधव याला पोलीस कोठडीत टाकण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरु केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी असे म्हटले की, आरोपीने उर्मिला हिला दिव येथे नेले आणि त्यानंतर ते जुनागढ येथे गेले. जाधव याने उर्मिला हिला भावनाथ येथील जंगलात नेले. त्यावेळी त्याने तिला म्हटले की, तेथील एका मंदितरात आपण प्रार्थनेसाठी जात आहोत. जाधव आणि उर्मिलाला खडसावले की आपण प्रेमसंबंधात आहोत. तेव्हा त्याने तिला खुप वेळा मारहाण सुद्धा केली आणि त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राजकोटचे पोलिस आयुक्त प्रविण कुमार यांनी याबद्दल अधिक माहिती पत्रकारांना दिली. या प्रकरणी आता आधिक तपास केला जात असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.