
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात लॉक डाऊन (Lockdown) जारी करण्यात आले आहे. यानुसार 3 मे पर्यंत सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी घालण्यात आली आहे. अशावेळी प्रेमी युगुलांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. अनेकांनी आपल्या प्रेयसी प्रियकराला भेटण्यासाठी एक ना अनेक शक्कला लढवण्यास सुरुवात केलीये अशीच काहीतरी ट्रेक करून गुजरात (Gujarat) मधील एक कपल अलीकडेच भेटलं होतं. वास्तविक भेटण्यासाठी हरकत नाही मात्र सोशल डिस्टंसिंगचा नियम धाब्यावर बसवत या कपलने गाडीत बसून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. याबाबत पोलिसांना पत्ता लागताच त्यांनी धाड टाकून या कपलला पकडले आहे. बीड: जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवर अश्लील चाळे करणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात
प्राप्त माहितीनुसार, गुजरातमधील अहमदाबादमध्ये ही घटना घडली. वस्त्रापूर परिसरात लॉकडाउननिमित्त गस्त घालणाऱ्या पोलिसांनी एका गाडीत अश्लिल कृत्य करणारे जोडपे दिसले. नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे. या कपलची चौकशी केली असता यातील महिला ही 40 वर्षीय असून पुरुष हा 30 वर्षीय होता. सदर महिला ही घटस्फोटीत आहे, आणि तिचे या तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची भेट झाली नव्हती. त्यानंतर त्या दोघांनी भेटण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत भेटून त्यांनी ही अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये असे सूचित करण्यात आले आहे. गुजरात मध्येही कोरोनाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. गुजरात मध्ये साध्य घडीला 2178 कोरोना रुग्ण असून त्यातील 90 जणांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय उपचार घेऊन 139 जणांनी कोरोनावर मात केली आहे.