बीड: जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवर अश्लील चाळे करणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात
Sex Racket (Photo Credits- Twitter)

बीड (Beed) शहरामधील जिल्हा रुग्णालयामध्ये (District hospital) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने गुरुवारी सकाळी पहाटे रुग्णालयाच्या छतावर दोन पुरुषांसोबत एक महिला अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर कर्मचाऱ्याने रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. मात्र, महिलेची कोणाचीही तक्रार नसल्याचे सांगत पोलिसांनी वरवर चौकशी करुन या तिघांना सोडून दिले आहे. या घटनेतील दोन्ही पुरुष हे कायम रुग्णालयातील आवरात फिरत असतात, अशीही माहिती समोर आली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयाच्या दोन इमारत आहेत. त्यापैंकी एका इमारतीत ओपीडी आणि प्रशायकीय कारभार पाहिला जातो. तर दुसऱ्या इमारतीमध्ये रुग्णांना दाखल केले जाते. ज्या इमारतीत रुग्णांना दाखल केले जाते, यात इमारतीच्या गच्चीवर दोन पुरुष आणि एक महिला अश्लील चाळे करताना रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसले. त्याने लगेच सुरक्षा रक्षकाला याची माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा रक्षकासह कर्मचाऱ्याने गच्चीवर धाव घेतली. गच्चीवर गेल्यानंतर या तिघांपैकी एक पुरुष आणि महिला नग्ग अवस्थेत आढळले. तसेच त्यावेळी त्यांच्याभोवती दारुच्या बाटल्या, कंडोमची पाकिटेही सापडले आहेत. रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने लगेच स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. परंतु, पोलिसांनी त्यांची वरवर चौकशी करुन त्यांना सोडून दिले. हे देखील वाचा- पुणे: एका हॉटेलमधील महिला स्वच्छतागृहात सापडला छुपा कॅमेरा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, अर्थिक गैरव्यवहारातून आरोपींची सुटका करण्यात आली आहे, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, आरोपी महिलेची यासंदर्भात कोणतीही तक्रार नसल्याने सर्वांना सोडून देण्यात आले, असे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.