पुणे (Pune) येथील हिंजवडीतील (Hinjawadi) एका हॉटेलच्या महिला स्वच्छतागृहामध्ये छुपा कॅमेरा (Hidden Camera) लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंजवडीमधील बी हाइव्ह हॉटेल मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी रात्री काही तरुणी पार्टी करण्यासाठी गेल्या असताना त्यावेळी महिला स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर संबधित तरुणींनी सर्व प्रकार हॉटेलच्या व्यवस्थापकाला सांगितला. मात्र, हॉटलच्या व्यवस्थापकाने त्यावेळी टाळाटाळ केली. त्यानंतर या तरुणींनी दुसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार सोशल मीडियावर टाकला. सोशल मीडियावर हा प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने स्थानिक पोलिसांनी स्वता बी हाईव्ह रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला फोन करुन यासंदर्भात विचारणा केली.

रविवारी पुण्यातील बी व्हाईव्ह रेस्टॉरंट येथे पार्टीसाठी आलेल्या तरुणींनीच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तरुणींच्या कामगिरीमुळे त्यांचे कौतुकही होत आहे. ज्यावेळी संबधित तरुणी पार्टी करण्यासाठी बी व्हाईव्ह हॉटेलमध्ये गेल्या त्यावेळी त्यांना स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा असल्याचे लक्षात आले. तरुणींनी छुपा कॅमेराचे फोटो काढून हॉटेलच्या व्यवस्थापकाला दाखवले. मात्र, हॉटेलची बदनामी होईल या भितीने हे गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानतंर या तरुणींनी दुसऱ्या दिवशी हे फोटो सोशल मीडियावर टाकले. पुणे पोलिसांनी हे फोटो बघताच हॉटेलच्या व्यवस्थापकाला फोन करुन बोलावून घेतले. हे देखील वाचा- पुणे: 21 वर्षीय तरुणीचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर केले शेअर; आरोपीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलचा कर्मचारी राम देब नाथ यानेच स्वच्छता गृहात छुपा कॅमेरा लावला होता, अशी माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकांनी दिली. नाथ याने रविवारी रात्रीच हिंजवडी येथून पळ काढला असून स्थानिक पोलिस त्याचा शोध घेत आहे.