सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात बहुतांश कामे ऑनलाइन घरी बसून केली जातात. अशा परिस्थितीत सरकारकडून लोकांच्या सोयीसाठी एक विशेष पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अनेक महत्त्वाची कामे करू शकता. यामुळे तुम्हाला सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. यासोबतच या ठिकाणी तुम्हाला तुमची अनेक महत्त्वाची कागदपत्रे देखील बनवता येतील. या पोर्टलवर 13,000 हून अधिक विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध असतील.
सरकारने जारी केलेल्या या विशेष पोर्टलचे नाव services.india.gov.in आहे. या पोर्टलद्वारे 13,350 सेवांचा लाभ घेता येईल. या पोर्टलद्वारे, वापरकर्ते त्यांचे आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करू शकतात. याशिवाय सरकारी लिलावातही सहभागी होता येईल. यासोबतच या पोर्टलद्वारे जन्म दाखलाही बनवता येईल. या सर्व कामांसाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. या अधिकृत पोर्टलवर विविध मंत्रालयांच्या सेवा देखील उपलब्ध आहेत. (हेही वाचा: ONDC Vs Swiggy and Zomato: ओएनडीसी द्वारे खाद्यपदार्थ कसे मागवाल? स्वीगी, झोमॅटोलाही बसतोय धक्का)
संरक्षण मंत्रालयाच्या 121 सेवा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या 100 सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 72 सेवा, वैयक्तिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या 60 सेवा, शिक्षण मंत्रालयाच्या 46 सेवा, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या 39 सेवा, परराष्ट्र मंत्रालयाच्या 38 सेवा इ. हे पोर्टल नक्की कसे काम करते हे जाणून घेण्यासाठी किंवा या पोर्टलद्वारे कोणत्याही सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला service.india.gov.in ला भेट द्यावी लागेल.
या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला असलेल्या All Categories च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला ज्या सेवांचा लाभ घ्यायचा आहे त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच, तुम्ही त्या सेवेच्या पोर्टलवर पोहोचाल. त्यानंतर तुम्ही त्या सेवेत प्रवेश करू शकता.