एअर मार्शल आर.के.एस. भदौरिया होणार वायुसेनेचे अध्यक्ष
RKS Bhadauria (Photo Credits-Twitter)

एअर व्हाइस चीफ एअर मार्शल आर. के. एस. भदौरिया (RKS Bhadauria) वायुसेनेचे (Air Force) आता नवे अध्यक्ष बनणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख प्रवक्ता यांच्या मते, सरकारने वायुसेनेच्या अध्यक्षपदी भदौरिया यांच्या नावाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तर एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांची जागा आता भदौरिया घेणार आहेत. बीएस धनोआ 30 सप्टेंबर रोडी चीफ ऑफ एअर स्टाफ पदावरुन निवृत्त होत आहेत.

आर.के.एस. भदौरिया हे भारतीय वायुसेनेतीले सर्वात उत्तम पायलटमन मधील एक आहेत. भदौरिया यांनी आता पर्यंत 16 प्रकारची लढाऊ विमाने आणि परिवहन विमाने उडवली आहेत. त्याचसोबत राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणी टीमचे चेअरमेन सुद्धा राहिले आहेत.(पाकिस्तानचे सीमेवर समस्या निर्माण करण्याचे प्रयत्न मोडीत काढण्यासाठी भारतीय सैन्य तयार: जम्मू काश्मीर पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांची माहिती)

राफेल विमानाचे उड्डाण केल्यानंतर भदौरिया यांनी असे म्हटले आहे की, राफेल हे जगातील उत्तम लढाऊ विमान आहे. तर राफेल भारतीय सैन्यात दाखल झाल्यास सेनेची ताकत अधिक पटीने वाढणार आहे. सुखोई आणि राफेल यांच्या जोडीच्या पुढे पाकिस्तान आणि चीन भारताच्या विरोधात कोणतेही चुकीची हालचाल करु शकत नाहीत.

एअर व्हाइस चीफ एअर मार्शल भदौरिया हे प्रायोगिक टेस्ट पायलटसह कॅट 'ए' कॅटेगरीमधील क्वालिफाइड फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि पायलट अटॅक इंस्ट्रक्टर आहेत. भदौरिया यांना वायु सेना पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि परम विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे.