'Goodbye, I'm Done'! कॉमेडीअन Munawar Faruqui चे 2 महिन्यात 12 शो रद्द; इमोशनल पोस्ट लिहित व्यक्त केले दुःख 
Munawar Faruqui (संग्रहित संपादित प्रतिमा)

राइट विंग ऑर्गनायझेशनच्या विरोधामुळे मुनावर फारुकीचा (Munawar Faruqui) स्टँडअप कॉमेडी कार्यक्रम रविवारी बेंगळुरूमध्ये रद्द झाला. त्यानंतर फारुकीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपले दु:ख व्यक्त केले. फारुकीने लिहिले आहे की, ‘पुन्हा एकदा द्वेषाचा विजय झाला आणि एक कलाकार हरला.’ फारुकीने आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली की, या शोची 600 हून अधिक तिकिटे विकली गेली होती, मात्र कार्यक्रमाची तोडफोड करण्याची धमकी दिल्यानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला. 2 महिन्यांत आपले 12 शो रद्द करण्यात आले असल्याचेही फारुकीने सांगितले.

मुनावर फारुकीने हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी एक महिना तुरुंगवासही भोगला आहे. कॉमेडियन फारुकी याने आज सर्व आव्हानांना बळी पडत तो पुन्हा कधीही शो करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आज बंगळुरूमध्ये मुनावरचा शो होणार होता, पण पोलिसांनी आयोजकांना कायदा आणि व्यवस्थेतील समस्यांमुळे तो रद्द करण्यास सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)

फारुकीने रविवारी संध्याकाळी 'डोंगरी टू नोव्हेअर'ची योजना आखली होती. नवी दिल्लीतील कर्टेन्स कॉल्स इव्हेंटचे विशाल धुरिया आणि सिद्धार्थ दास यांनी बंगळुरूमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, श्री राम सेना आणि हिंदु जनजागृती समितीसह विविध उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी या कॉमेडियनविरोधात बेंगळुरू पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. कॉमेडियनवर हिंदू देवतांचा अपमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला. (हेही वाचा: Gautam Gambhir: ISIS कडून क्रिकेटपटू गौतम गंभीर यास जीवे मारण्याची तिसऱ्यांदा धमकी)

त्यानंतर अशोकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शनिचार यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना पत्र लिहून विनोदी कलाकार वादग्रस्त असल्याने कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली. आपल्या पत्रात, निरीक्षक म्हणाले, ‘मुनावर फारुकी एक वादग्रस्त व्यक्ती असल्याचे समजले आहे. त्याच्या कॉमेडी शोवर अनेक राज्यांनी बंदी घातली आहे. त्याच्याविरुद्ध मध्य प्रदेशातील इंदूर येथील तुकोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या कार्यक्रमाला अनेक संघटना विरोध करत आहेत. या कार्यक्रमामुळे अशांतता, शांतता आणि सौहार्दाचा भंग होऊ शकतो म्हणूनच तुम्ही फारुकीचा स्टँडअप कॉमेडी शो रद्द करावा.