सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असले तरीही सोन्या-चांदीच्या दरात गेल्या पाच दिवसांपासून मोठी घट होत आहे. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये मजबूती आली असून सोन्याचे दर कमी झाले आहेत. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 73 रुपये प्रति दहा ग्रॅमने कमी झाले आहेत. याच दरम्यान चांदी 89 रुपये प्रति किलोग्रॅमने स्वस्त झाली आहे. HDFC सिक्योरिटीचे सिनियर तपन पटेल यांनी असे म्हटले आहे की, डॉलरचे दरात घट झाल्याने सोन्याचे दरात ही घट झाली आहे. देशभरातील गुंतवणीकदारांचे लक्ष आता अमेरिका आणि चीन या देशांमधील ट्रेड डील कडे लागून राहिले आहे. यासाठी 15 डिसेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
बुधवारी सोन्याचा दर 99.99 शुद्ध असलेले 38,486 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचले आहेत. तर मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 38,555 रुपयांवरुन 38,460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,464.8 डॉलर प्रति औंस आणि चांदीचे दर 16.62 प्रति औंस राहिला आहे. त्याचसोबत चांदीचा दर 44,729 रुपयांवरुन 44,640 रुपये झाले आहेत. या दरम्यान चांदी 89 रुपयांनी स्वस्त झाली आहे.(Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)
तर सोन्यावर हॉलमार्क असणे हे येत्या 21 जानेवारी 2021 पासून अनिवार्य होणार आहे. याबाबत सरकारकडून 15 जानेवारीला एक नोटिस जाहीर करणार आहे. याचा अर्थ सोनारांना हॉलमार्क दागिने विकणे गरजचे ठरणार आहे. तर बीआयएस कायद्याअंतर्गत हॉलमार्कचे नियम तोडणाऱ्यांवर कमीतकमी 1 लाख रुपयांचे दागिते ते त्यापेक्षा 5 पट अधिक दंडाची वसूली करण्यात येणार आहे.