चोरीच्या घटना आणि दागिन्यांमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने एक निर्णय घेतलाय. 15 जानेवारी 2021 पासून सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर हॉलमार्क हा सक्तीचा करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी घेण्यात आलेला निर्णय ग्राहकांसाठी खूपच चांगला आणि फायद्याचा ठरेल अशी अपेक्षा रामविलास पासवान यांनी व्यक्त केली आहे.
खरे पाहता 15 जानेवारी 2020 याबाबतच्या अधिसूचना जारी करण्यात येणार आहे, परंतू त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी वर्षभराचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे सोने खरेदीबाबत होणा-या फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल. देशभरात केवळ 40% दागिन्यांवरच हॉलमार्क आहे.
हेदेखील वाचा- Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे
हॉलमार्किंग म्हणजे थोडक्यात सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा असतो. त्यामुळे ग्राहक हे हॉलमार्क पाहून बेफिकिर होऊन सोने खरेदी करु शकतात. देशभरात असे 800 हॉलमार्किंग सेंटर आहेत. तर जगभराक सर्वाधिक सोन्याची आयात ही भारतात होते.