Gold Rate Today: इराण-अमेरिका मधील तणावामुळे सोन्याचा आजचा दर 42 हजारांवर
Gold | Representational Image | (Photo Credits: IANS)

अमेरिका आणि इराण यांच्या मध्ये सद्धा तणाव सुरु असून शेअर बाजारात घसरण आल्याचे दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी शेअरमार्केट पेक्षा सोन्याकडे वळले आहेत. आंतरराष्ट्रीय किंवा लोकल मार्केटमध्ये सोन्याचे भाव याच कारणांमुळे वाढत चालले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर गेल्या 7 वर्षातील रेकॉर्डब्रेक ठरले. एसमीएक्सवर सुद्धा रेकॉर्ड वेगाने दिसून आला.

कमांडर कासिम सुलेमान याची हत्या केल्यानंतर खव्वळलेल्या इराण याने अमेरिकेवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही देशातील तणाव पाहता तिसरे महायुद्ध होण्याची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. याच कारणामुळे गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. मात्र अधिक नफा मिळवण्यासाठी गुंतवणूकादार सोन्यात गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. आज सकाळी सोन्याचे दर 42,400.00 रुपये झाला आहे.(Gold and Petrol Diesel Rate Today: अमेरिका- इराण संघर्षाचा फटका सामान्यांना; सोन्याचा भाव 41 हजाराच्या पार; पेट्रोल- डिझेल मध्ये सुद्धा दरवाढ)

सर्वसाधारणपणे पाहायचे तर कोणतीही वस्तू स्वस्तात उपलब्ध असते तेव्हा लोक ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. परंतू, सराफा बाजारात काहीसे या उलट पाहायला मिळते. सर्वसामान्य बाजारपेठेचा नियम इथे लागू पडत नाही. इथे सोनं महाग होणार अशी शक्यता दिसली की लोक खरेदीसाठी अधिक घाई करतात. मात्र, अतीमहागाईचा नाही म्हटले तरी सराफा बाजारातील व्यवहारावर परीणाम झालेला पाहायला मिळते. तर खरेदी केलेले सोने बनावट तर नाही ना हे तपासायचे कसे असा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यावर सरकारने एक नवा नियम लागू करणार आहे. या नव्या नियमामुळे बनावट सोने विक्रीवर आळा घालून फक्त शुद्ध सोनेच बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे.