Gold and Petrol Diesel Rate Today: अमेरिका- इराण संघर्षाचा फटका सामान्यांना; सोन्याचा भाव 41 हजाराच्या पार; पेट्रोल- डिझेल मध्ये  सुद्धा दरवाढ
Gold and Petrol Diesel Rate Today (Photo Credits: File Image)

अमेरिका (America)  आणि इराण (Iran)  मध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाचा मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेत दिसून येत आहे. एकीकडे सोने (Gold) , चांदी (Silver) , पेट्रोल (Petrol) , डिझेल (Diesel) , यांचे भाव दिवसागणिक वाढत आहेत तर डॉलरच्या (Dollar)  तुलनेत भारतीय रुपयांचा भाव सातत्याने घसरताना दिसत आहे. आजच्या माहितीनुसार, सराफा बाजारात आज सोन्याचा दर प्रति 10 ग्राम हा 41 हजार 730 रुपये आहे कालच्या तुलनेत यामध्ये एकाएकी 720 रुपयांची दरवाढ झाली आहे. तर चांदीचे भाव देखील काल 51,042 रुपये प्रतिकिलो असे होते. येत्या काळात हे भाव आणखीन वधारण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाचे भाव सुद्धा वाढत आहेत येत्या काही दिवसात ही किंमत 70 $ प्रतिबॅरल वरून किमान 82 $ प्रति बॅरल होऊ शकते. सोबतच आजचे पेट्रोल डिझेलचे भाव पाहता, पेट्रोल सध्या प्रति लिटर 81 रुपये 58 पैसे आणि डिझेल प्रति लिटर 71 रुपये 02  पैसे इतक्या दराने विकले जात आहे.

एकीकडे काही वस्तूंच्या दरामध्ये वाढ होत असताना, शेअर बाजारात मात्र बरीच घसरण पाहायला मिळत आहे. काल, सेन्सेक्स 789 अंकांनी निफ्टी 233 अंकांनी खाली आले आहे, एकूणच या परिस्थितीमुळे काल गुंतवणूकदारांना 3  लाखांचा फटका बसला आहे. भारतीय रुपया सुद्धा डॉलरच्या तुलनेत खाली येताना दिसत आहे. काल रुपयात 13 पैशांनी घसरण होऊन आज डॉलरचा दर 71 रुपये 93 पैसे आहे.

थोडक्यात दर..

सोने - प्रति दहा ग्राम- 41 हजार 730 रुपये

चांदी - प्रति किलो- 51 हजार 42 रुपये

पेट्रोल- प्रति लिटर- 81 रुपये 58 पैसे

डिझेल - प्रति लिटर- 72 रुपये 02  पैसे

दरम्यान, अमेरिका आणि इराण मधील परिस्थिती येत्या काळात बिघडत गेल्यास ही दरवाढ कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने केलेल्या एअर स्ट्राइक मध्ये कमांडर कासिम सुलेमान याची हत्या झाल्याने इराण कडून देखेल युद्धाचा इशारा दिला जात आहे. परिणामी असे झाल्यास तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे गुंतणूकदारांमध्ये गुंतणूकीबाबत निश्चितता नसल्याने सध्या शेअर मार्केट ऐवजी सोने- चांदी या सुरक्षित पर्यायात गुंतवणूक करत आहेत, परिणामी या बाजारात भाव वाढ दिसत आहे.