Photo Credit- X

सोन्याच्या दरांनी आज पुन्हा उसळी घेतली आहे. एकीकडे लग्नसराईचा मौसम सुरू असताना आणि जागतिक बाजारात चढ उतार होत असताना त्याचे परिणाम सोन्याच्या दरांवर थेट आढळून येत आहे. आज दिल्लीमध्ये सोन्याचा दर 1 लाखाच्या जवळ पोहचल्याचं दिसून आलं आहे. रूपयामध्ये घसरण होत असताना आज सोन्याचा दर दिल्लीत आठवड्याच्या सुरूवातीला 1650 रूपयांनी वाढला. अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचे दर सोमवारी Rs 99,800 प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. शुक्रवारी त्याचे मूल्य 20 रुपयांनी घसरून 98,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

स्थानिक बाजारात 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 1600 रुपयांनी वाढून 99300 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचला. मागील बाजार बंद होताना तो किरकोळ घसरण होऊन 97,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिरावला होता.

मुंबई मध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम 9835 रूपये होता. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 9015 प्रतिग्राम मोजावे लागले आहेत. चांदी प्रति किलो 1,01,000 पर्यंत पोहचली आहे. अशी माहिती Goodreturns वेबसाईट वर देण्यात आली आहे.

आजचे सोन्याचे दर काय?

गेल्या वर्षी 31  डिसेंबरपासून या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 20,850 रुपये किंवा 26.41  टक्क्यांनी वाढल्या आहेत. चांदीच्या किमतीही 500 रुपयांनी वाढून 98,500 रुपये प्रति किलो झाल्या आहेत. शुक्रवारी चांदीचा भाव 98,000 रुपये प्रति किलोवर स्थिर होता. नक्की वाचा: Gold Rate: सोने कधीपर्यंत महागणार? वाढलेल्या दराला कधी लागणार ब्रेक? जाणून घ्या .

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, जून डिलिव्हरीसाठी gold futures  1621 रुपये किंवा 1.7 टक्क्यांनी वाढून 96875 रुपये प्रति 10  ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचला  आहे.