सराफा बाजारात आज सोने चांदी दरात (Gold-Silver Rate) हलकीशी घसरण पाहायला मिळाली. ऑक्टोबर वायदे बाजारात सोने 68 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्राम 47535 रुपये दरांनी विक्री होताना पाहायला मिळाले. तर चांदी सप्टंबरच्या वायदे बाजारात 59 रुपये घसरणीसोबत प्रति किलो 66939 रुपये दराने विक्री होताना पाहायला मिळाले. गुरुवारी एमसीएक्स वर सोने 35 रुपये म्हणजे 0.07% घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 47,847 रुपये दरांवर होते. तर चांदी प्रति किलो 67,488 रुपये प्रति किलोग्राम इतकी होती.
वृत्तसंस्था रॉयटर्नसने दिलेल्या वृत्तानुसार डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने शुक्रवारी सोने दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली. (हेही वाचा, World's Most Expensive Ice Cream: दुबईमध्ये विकले जात आहे जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम; होत आहे 23 कॅरेट सोन्याचा वापर, जाणून घ्या किंमत (Watch Video)
देशातील प्रमुख शहरांतील सोने दर
नवी दिल्ली 22 कॅरेट सोने दर- 46,940 रुपये (प्रति 10 ग्राम)
चेन्नई 22 कॅरेट सोने दर- 45,000 रुपये (प्रति 10 ग्राम)
मुंबई 22 कैरेट सोने दर- 46,980 रुपये (प्रति 10 ग्राम)
कोलकाता 22 कैरेट सोने दर- 47,290 रुपये (प्रति 10 ग्राम)
बेंगलुरु 22 कैरेट सोने दर- 44,600 रुपये (प्रति 10 ग्राम)
देशातील प्रमुख शहरांतील चांदी दर
नवी दिल्ली चांदी दर- 66,800 रुपये प्रति किलो
चेन्नई चांदी दर-71,700 रुपये प्रति किलो
मुंबई चांदी दर- 66,800 रुपये प्रति किलो
बंगळुरु चांदी दर- 66,800 रुपये प्रति किलो
सोने चांदी खरेदी करताना शुद्धतेची पडताळणी करुन घेणे अतिशय आवश्यक आहे. भारत सरकारने नागरिकांच्या मदतीसाठी BIS Care App बनवले आहे. याच अॅपच्या माध्यमातून आपण सोन्याची पडताळणी करुन शुद्धचा जाणून घेऊ शकता. आपल्याला सोन्याबाबत केवळ पडताळणीच नव्हे तर काही तक्रार असेल तर तीही आपण करु शकता.