Gold Rate Today: आज अष्टमीचा दिवस आणि उद्या म्हणजेच 25 ऑक्टोबरला दसरा (Dussehra). सणासुदीच्या दिवसात सोन्याला चांगलीच झळाळी येते हे जगजाहीर आहे. मात्र दस-यानिमित्त सोन्याला चांगलाचा भाव येतो. दस-याच्या एक दिवस आधी सोने 50,000 च्या पार गेले असून काही शहरांमध्ये तर ते 53,000 च्या पार गेले आहे. त्यामुळे यंदा दस-याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला उधाण येणार की सोने खरेदी मंदावणार हे उद्या कळेलच. मात्र सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार होत असले तरीही दस-याला सोने खरेदी दरवर्षी होतेच. त्यामुळे सर्व सोने व्यापारी सज्ज झाले असून अनेक नवनवीन अलंकार सराफाच्या दुकानात ठेवण्यात आले आहेत.
मुंबईत 24 कॅरेट (24 Carat Gold) सोन्याचा दर प्रति तोळा 51,160 रुपये इतका असून 22 कॅरेट (22 Carat Gold) सोन्याचा दर प्रति तोळा 50,160 रुपये इतके आहे. तर पुण्यात मध्येही हेच दर ठेवण्यात आले आहेत. नवी दिल्लीत मात्र सोने प्रति तोळा 53,010 रुपये इतके झाले आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 49,510 रुपये इतके झाले आहे.हेदेखील वाचा- Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूचं; जाणून घ्या आजचे दर
पाहूयात अन्य महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर:
शहर | 24 कॅरेट/प्रतितोळा | 22 कॅरेट/प्रतितोळा |
मुंबई | 51,160 रुपये | 50,160 रुपये |
पुणे | 51,160 रुपये | 50,160 रुपये |
चेन्नई | 51,390 रुपये | 47,110 रुपये |
हैदराबाद | 51,390 रुपये | 47,110 रुपये |
नवी दिल्ली | 53,010 रुपये | 49,510 रुपये |
बंगळूरू | 51,410 रुपये | 47,220 रुपये |
कोरोना व्हायरस संकटाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाला आहे. त्यामुळे दरात चढ-उतार दिसत आहे. मात्र लोकांवर यंदा कोरोना व्हायरस आणि पावसामुळे आर्थिक संकट देखील आले असताना उद्या सोन्याची खरेदी कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.