Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्यांच्या भावामध्ये प्रचंड उतार-चढाव पाहायला मिळत आहेत. गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅमला 50,766 रुपयांवर बंद झाले. आज 99 रुपयांच्या वाढीसह सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 50,865 रुपये इतका झाला आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून पडझड सुरू आहे. त्यामुळे पुढे सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल की, नाही हे निश्चिच सांगता येत नाही. स्पॉट मार्केटच्या कमकुवत मागणीमुळे व्यापाऱ्यांनी त्यांचे सौदे कमी केले. यामुळे गुरुवारी फ्युचर्स मार्केटमध्ये 0.41 टक्क्यांनी घट होऊन ते 51,122 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरमधील सोन्याचे वायदे 211 रुपये किंवा 0.41 टक्क्यांनी घसरून 51,122 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. जागतिक पातळीवरील कमकुवत कल आणि रुपयाचे मूल्य यांच्यातील सुधार दरम्यान गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 95 रुपयांनी घसरून 51,405 रुपयांवर आला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 51,500 रुपयांवर बंद झाला होता. तसेच चांदी 504 रुपयांनी घसरून 63,425 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय बाजारात सराफ बाजार कमकुवत झाल्यामुळे आणि रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे 24 कॅरेट सोन्याच्या किंमती दिल्लीत 95 रुपयांनी खाली आल्या. डॉलरच्या तुलनेत रुपया चार पैशांनी वाढून 73.54 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर 1,918 डॉलर प्रति औंस पर्यंत घसरले तर चांदीचे दर 24.89 डॉलर प्रति औंसवर कायम राहिले. (हेही वाचा - 'मास्क' ठरू शकतं कोरोना विरुद्धची सामाजिक लस; रुमाल किंवा मास्क लावल्याने हवेतील कोरोना संसर्ग 7 ते 23 टक्क्यांनी कमी होऊ शकतो - संशोधन)
दरम्यान, 7 ऑगस्ट 2020 हा दिवस होता जेव्हा सोन्या-चांदीने नवीन विक्रम निर्माण केला. सोने आणि चांदी या दोन्हींनी त्यांच्या नेहमीच्या उच्चांकास स्पर्श केला. 7 आॅगस्ट रोजी सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेले, तर चांदी 77,840 रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याच्या दरामध्ये आतापर्यंत प्रति ग्रॅम सुमारे 5500 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी प्रति किलो 15,800 रुपयांनी खाली आली आहे.
याशिवाय कोरोना विषाणूमुळे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. जगभरातील बहुतेक स्टॉक मार्केट्स कोरोनामुळे पडझडीमुळे सावरत आहेत. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांचे म्हणणे आहे की, सोन्याची किंमत 50 हजार रुपयांच्या उंचीवरून खाली आली आहे, तर चांदी 60 हजार रुपयांच्या श्रेणीत आली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, येत्या काही दिवसांतही चढ-उतार चालूच राहू शकतात. (हेही वाचा - How To Check PF Balance: तुमची कंपनी दर महिन्याला पीएफ खात्यात पैसे जमा करते की नाही? असे घ्या जाणून)
दरम्यान, सोन्याच्या घसरणीमागील प्रमुख कारण म्हणजे मागील 2 महिन्यांतील रुपयाची मजबुतीकरण. आता रुपया प्रति डॉलर 73-74 रुपयांवर पोचला आहे, जो काही महिन्यांपूर्वी 76-77 रुपयांवर घसरला होता. जर डॉलर पुन्हा मजबूत झाला तर सोन्याचे दर पुन्हा वाढतील. येत्या काही दिवसांत डॉलर पुन्हा मजबूत होणार आहे. म्हणजेच, पुढील वर्षापर्यंत सोन्याचे दर 10 ग्रॅम 60-70 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.