How To Check PF Balance: तुमची कंपनी दर महिन्याला पीएफ खात्यात पैसे जमा करते की नाही? असे घ्या जाणून
जेव्हा तुम्ही अशा एखाद्या कंपनीमध्ये काम करता, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) अंतर्गत नोंदणीकृत आहे, तेव्हा तुम्हाला तुमच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीच्या वतीने ईपीएफओमध्ये जमा करावी लागेल.
जेव्हा तुम्ही अशा एखाद्या कंपनीमध्ये काम करता, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) अंतर्गत नोंदणीकृत आहे, तेव्हा तुम्हाला तुमच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीच्या वतीने ईपीएफओमध्ये जमा करावी लागेल. यासाठी कंपनी दरमहा तुमच्या पगारामधून भविष्य निर्वाह निधी (EPF Money) रक्कम वजा करते. तर, आपल्या पीएफचे पैसे वेळच्यावेळी ईपीएफओमध्ये जमा करणे ही कंपनीची जबाबदारी आहे. परंतु बर्याच वेळा असे निदर्शनास आले आहे की, काही कंपन्या कर्मचार्यांच्या पगारामधून ही रक्कम कपात करून घेतात, परंतु ती ईपीएफओमध्ये जमा करत नाही
ईपीएफ हा सरकारी किंवा बिगर सरकारी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचार्यासाठी गुंतवणूकीचा एक प्रकार आहे जो त्याच्या भविष्यात उपयुक्त ठरतो. नियमांनुसार, ज्या कंपनीत किंवा संस्थेमध्ये 20 किंवा अधिक कर्मचारी आहेत, त्यांनी ईपीएफओमध्ये नोंदणी केली पाहिजे. कर्मचार्यांना त्यांच्या पीएफ खात्याची व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी, ईपीएफओने अनेक सेवा सुरू केल्या आहेत. आपण फोनवरून, एसएमएसद्वारे किंवा वेबसाईटला भेट देऊन आपल्या पीएफ खात्याची माहिती मिळवू शकता.
फोनवरून ही माहिली मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 011-229-01-406 नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. परंतु लक्षात ठेवा आपण ज्या नंबर वरून कॉल करीत आहात तो फोन नंबर ईपीएफओसह नोंदणीकृत असावा. या सुविधेसाठी आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ईपीएफ पोर्टलमध्ये सक्रिय असावा.
तुम्ही एसएमएस (SMS) वरूनही ही माहिती मिळवू शकता. एसएमएस सेवेसाठी यूएएन पोर्टलमध्ये, सक्रिय सदस्यांना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून, ‘EPFOHO UAN’ असा एसएमएस लिहून तो 7738299899 क्रमांकावर पाठवावा लागेल. विशेष म्हणजे ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. (हेही वाचा: केंद्र सरकार मोठा निर्णय; 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 3,737 कोटी रुपयांचा बोनस जाहीर, जाणून घ्या कधी मिळेल रक्कम)
नोंदणीकृत 10 भाषांपैकी कोणत्याही एकामध्ये माहिती मिळवायची असल्यास, त्यासाठी तुम्हाला त्या भाषेची पहिली तीन अक्षरे एसएमएसमध्ये टाइप करावी लागतील. उदाहरणार्थ, आपल्याला आपल्या नोंदणीकृत फोन नंबरवरून पंजाबीमध्ये पीएफ खात्याची माहिती मिळवायची असेल तर, ‘EPFOHO UAN PUN’ टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल.
मिस कॉल आणि एसएमएस व्यतिरिक्त आपण उमंग (UMANG) अॅपद्वारे पीएफ खात्याची माहिती मिळवू शकता. फोन केल्यावरही तुम्हाला तुमच्या पीएफ हफ्ता, पीएफ खात्यातील शिल्लक आणि केवायसीची माहिती मिळेल.
(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2020 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

