आंध्र प्रदेश: गोदावरी नदीत पर्यटन नाव उलटल्याने बरेच प्रवासी बुडाल्याची शक्यता
(Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) गोदावरी नदीत (Godavari River) रविवारी दुपारीच्या वेळेस एक पर्यटन नाव उलटल्याची घटना घडली आहे. यामुळे या नाव मध्ये असलेले बरेच प्रवासी बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबात पोलिसांच्या सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. तर आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार, नाव मधील 10 प्रवाशांना सुखरुप नदीतून बाहेर काढण्यात आले आहे. परंतु नाव मध्ये किती जण होते आणि कशामुळे ती उलटली याबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर गोदावरी नदीला गेल्या काही दिवसांपासून राज्यात पडलेल्या पावसामुळे तिची पातळी वाढली आहे. तर जिल्हा पोलीस अधिक्षक अदनान अस्मी यांनी असे म्हटले आहे की, या प्रकरणाची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत.(गणपती विसर्जन करताना नाव उलटली, 11 जणांचा मृत्यू, 5 थोडक्यात बचावले)

ANI Tweet:

पर्यटन विकास निगम यांच्या द्वारे असे सांगण्यात आले आहे की, नाव मध्ये जवळजवळ 60 प्रवासी होत. त्यामधीलच 11 जण चालक होते. नाव कच्चुलुरु येथे पलटली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर या दुर्घटनेतील पीडित नागरिकांचा शोध हेलिकॉप्टरच्या माध्यमातून घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर गणेशोत्सवादरम्यान भोपाळ येथे ही बोट पलटून 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या दुर्घटनेत एका अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच गणेशोत्सव विसर्जनावेळी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील बुडून मृत्यू झालेल्यांचा आकडा 24 तासात 40 वर गेला होता.