खुशखबर! GoAir कडून दिली जातेय 859 रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी, जाणून घ्या अधिक
प्रातिनिधिक प्रतिमा (Image: Twitter, @goairlinesindia)

कमी खर्चात विमान प्रवास करण्याऱ्यांसाठी अत्यंत खुशखबर आहे. कारण शिखाला परवडणारी सेवा उपलब्ध करुन देणारी GoAir यांनी अत्यंत कमी किंमतीत 10 लाखांच्या सीट्सची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वीच गोएअर कंपनीने मर्यादित कालावधीसाठी तिकिटांचे दर 859 रुपयांपासून सुरु केले आहेत. गोएअरच्या या आकर्षक ऑफरचा लाभ येत्या 22 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यंत घेता येणार आहे. या तिकिटांच्या माध्यमातून 1 एप्रिल ते 31 डिसेंबर पर्यंत प्रवास करता येणार आहे. परंतु या तिकिटांवर देशाअंतर्गत नागरिकांना फिरता येणार आहे.

एअरलाइन्सने असे म्हटले की, या स्पेशल सेलमध्ये तिकिट बुकिंग थेट उड्डाणांसाठी असणार आहे. विशेष दर असणाऱ्या तिकीट फक्त एकतर्फी प्रवासासाठी आहे. या व्यतिरिक्त ऑफर अंतर्गत करण्यात आलेल्या बुकिंग तिकिटांवर यात्रेपूर्वी 14 दिवसांपर्यंत कोणताच बदल शुल्क लागणार नाही आहे.(Stock Market: इतिहासात पहिल्यांदाच BSE सेन्सेक्स 50,000 पार, निफ्टी 14,700 अंकाच्याही पुढे)

Tweet:

गोएअरचे सीईओ कौशिक खोना यांनी असे म्हटले की, रिपब्लिक डे फ्रीडम सेल नुसार प्रवासी आपल्या प्रवासाच्या खर्चात आणि विदेशातील ठिकाणी प्रवास करण्याचे पैसे यामधून वाचवू शकणार आहेत. आम्हाला विश्वास आहे की, प्रवाशांना ही ऑफर लोकप्रिय ठरेल. एअरलाइन्सने या सेल अंतर्गत 10 लाख सीट्सची विक्री केली जाणार आहे.