गोवा: भाजप पक्षाचे प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री, सोमवारी रात्री उशिरा घेतली शपथ (Photo Credits-Twitter)

पणजी: भाजप (BJP) पक्षाचे प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सोमवारी (18 मार्च) रात्री उशिरा गोव्याच्या मुख्यंमंत्री पदाची शपथ घेतली. तर राज्यपाल मृदुला सिन्हा (Mridula Sinha) यांनी रात्री 2 वाजता राजभवनात 46 वर्षीय सावंत यांना मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेण्यास सांगितले. सावंत ह्यांच्या व्यतिरिक्त पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटच्या 11 आमदारांनीसुद्धा मंत्री रुपात शपथ घेतली. यापूर्वी शपथविधी सोमवारी रात्री 11 वाजता होणार होता. परंतु काही कारणामुळे यासाठी वेळ लागला. सावंत हे गोव्याच्या विधानसभेचे अध्यक्ष होते.

यापूर्वी सावंत यांनी असे म्हटले होते की, भाजपने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. तसेच पत्रकारांना सावंत यांनी असे सांगितले की, नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर मनोहर पर्रिकर यांच्या जागी आता सावंत ह्यांना मुख्यमंत्री पदाचा कारभार सोपण्यात आला आहे.(हेही वाचा-मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री पद भाजप नेते प्रमोद सावंत यांच्याकडे; 10 मुद्दे)

सावंत यांना गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नेमणुक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. याबद्दल भाजप आणि मित्रपक्षातील आमदारांच्या बैठका सुद्धा घेण्यात आल्या. तसेच प्रमोद सावंत हे विधानसभेचे अध्यक्ष आणि साखळी मतदार संघाचे आमदार सुद्धा होते.