
गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे रविवारी निधन झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. परंतु गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला असून गोव्याचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रमोद सावंत यांना गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नेमणुक केली जाण्याची शक्यता आहे. याबद्दल भाजप आणि मित्रपक्षातील आमदारांच्या बैठका सुरु आहेत. तसेच प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष असून साखळी मतदार संघाचे आमदार सुद्धा आहेत. तर भाजप कडून प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा कारभार देणार असल्याची चर्चा झाली आहे. त्याचसोबत भाजप, गोवा फॉर्वर्ड पार्टीने सावंत यांच्या नावाला सहमती दाखवली आहे. मात्र महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने याबद्दल अद्याप काही स्पष्ट केले नाही आहे. तत्पूर्वी आज दुपारी भाजप विधीमंडळ गटनेत्याची निवड करु शकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(हेही वाचा-गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावा, तर पर्रिकर यांच्या सरकारला बहुमत मिळणार नाही)
तर काँग्रेने त्यांची सत्ता भाजप मध्ये स्थापन करण्याचा दावा केला आहे. यासंबंधित मृदुल सिन्हा यांना शनिवारी पत्र लिहून त्यामध्ये काँग्रेस सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी रविवारी गोव्यात दाखल झाले असून त्यांनी युती सरकारच्या आमदारांसोबत बैठक घेतली होती. परंतु प्रमोद सावंत यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येणार असल्याचे म्हटले जात आहे.