
नवी दिल्ली: ABCD या जर्मन कंपनीच्या 2018 मधील कॅनाबिस प्राईज इंडेक्स अहवालानुसार जागतिक स्तरावर सर्वाधिक गांजाचे सेवन (Weed Consumption) करणाऱ्या शहरांची एक यादी नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये भारताचे राजधानी दिल्ली (Delhi) आणि आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) यांचा अनुक्रमे तिसऱ्या व सहाव्या स्थानी समावेश आहे. TOI च्या वृत्तानुसार, या यादीत न्यूयॉर्कचा पहिला क्रमांक असून पाकिस्तानच्या कराची शहराचे गांजा सेवन प्रमाण हे दुसऱ्या स्थानी आहे. तत्पूर्वी भारतात देखील AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) ने केलेल्या परीक्षणात देशातील 3.1 कोटी नागरिक हे अंमली पदार्थ जसे की, चरस, गांजा,भांग यांचे सेवन करत असल्याचे समोर आले होते.
या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये 2018 च्या संपूर्ण वर्षात तब्बल 38.8 टन इतका गांजा सेवन करण्यात आला तर मुंबईत देखील 32. 4 टन गांजा सेवनाचे प्रमाण आढळून आले आहे. या यादीत टॉप वर असणाऱ्या न्यू यॉर्क शहरात तर हे प्रमाण 77.4 टन इतके असून या पाठोपाठ 42 टन रेकॉर्डसह कराची शहराने दुसरे स्थान मिळवले आहे. (सॅनिटरी पॅड मधून 3 कोटीच्या ड्रग्जची तस्करी करताना महिलेला अटक; भारत-कतार स्मगलिंग रॅकेटचा पर्दाफाश)
या यादीत, लॉस एंजेल्स, काहिरा, लंडन, शिकागो, मॉस्को, टोरोंटो या शहरांचा देखील समावेश आहे. याशिवाय अहवालामध्ये समोर आलेल्या परीक्षणात प्रत्येक शहरात गांजा काय भवन एबिकला जातो याचाही तपास करण्यात आला आहे, यानुसार दिल्ली मध्ये गांजा 315 रुपये 1 ग्राम तर मुंबईत 329 रुपये 1 ग्रामच्या दराने ही विक्री होते. तूर्तास यादीत असलेल्या शहरांमध्ये टोरोंटो सोडल्यास सर्वत्र गांजा विक्री ही अवैध आहे.
दरम्यान, जर्मन कंपनी ABCD यांनी सादर केलेल्या या अहवालानंतर गांजा, चरस इत्यादी पदार्थाची विक्री ही अधिकृत करावी अशी मागणी केली जात आहे. या पदार्थांची किमंत पाहता जर का सरकारतर्फे टॉप सिगरेटवर लागण्यात आलेला कर हा गांज्याच्या वापरावर लावून अधिकृत विक्री केली तर सरकारला कोट्यवधी रुपयांची मिळकत होईल असेही सुचवण्यात आले आहे.