Giu Village Gets Mobile Network For First Time: चीनच्या सीमेला लागून असलेल्या हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) स्पितीमधील गिऊ गाव (Giu Village) गुरुवारी प्रथमच मोबाइल नेटवर्कशी जोडले गेले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामस्थांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. गिऊ गावात मोबाईल नेटवर्क आल्याने दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी गोष्टी अधिक सोप्या होणार आहेत. यापूर्वी या लोकांकडे संपर्काचे कोणतेही साधन नव्हते. हे मोबाइल नेटवर्क या गावाच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
पंतप्रधान मोदींनी गिऊ गावकऱ्यांशी 13 मिनिटांहून अधिक काळ फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवाळीच्या काळात सीमावर्ती भागाला दिलेल्या भेटीबाबत चर्चा करून गाव मोबाईल नेटवर्कशी जोडल्यानंतर ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला गती मिळेल, असे सांगितले.
यावेळी पीएम म्हणाले की, ते सत्तेवर आले तेव्हा देशातील 18,000 हून अधिक गावांमध्ये वीज नव्हती. आता या गावांना वीजपुरवठा करण्यात आला आहे. आता सरकार दुर्गम भागांना दळणवळण तंत्रज्ञानाने जोडण्यास प्राधान्य देत आहे. पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे सरकार 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम (VVP)' अंतर्गत सीमावर्ती भागातील विकासाला चालना देण्यासाठी काम करत आहे. आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये ते लोकांच्या जीवनमानाच्या दर्जावर लक्ष केंद्रित करून राहणीमान सुलभतेला प्राधान्य देणार असून यामुळे दुर्गम भागातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: PM Modi Hasn't Taken Single Leave: पीएम नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत घेतली नाही एकही दिवसाची रजा; 65,700 तास केले काम)
#WATCH | PM Modi spoke to villagers of Giu in Spiti, Himachal Pradesh after the village got mobile network for the first time today pic.twitter.com/azNHUD1kS4
— ANI (@ANI) April 18, 2024
ते म्हणाले की, 'एक जिल्हा एक उत्पादन' कार्यक्रमाचाही या प्रदेशाला मोठा फायदा होईल. एका गावकऱ्याने पंतप्रधानांना सांगितले की, हा भाग मोबाईल नेटवर्कशी जोडला गेला आहे, यावर त्यांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. आता हे घडल्यामुळे आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. त्याने सांगितले की, पूर्वी त्याला मोबाईल वापरण्यासाठी आठ किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. गिऊ हे दुर्गम गाव समुद्रसपाटीपासून 14,931 फूट उंचीवर आहे, जिथे लोक आता फोनवर बोलू शकतात.