Valentine's Day: कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थीनीला या ‘व्हेलेंटाईन्स डे’ला बॉयफ्रेन्ड असणं बंधनकारक, थेट कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी काढली नोटीस
Valentine's Day 2019 (File Image)

वर्षातील पहिला महिना जानेवारीची सांगता लवकरचं होणार असुन पुढल्या आठवड्यापासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी म्हण्टलं की चाहुल लागते ती प्रेमाच्या दिवसाची. व्हेलेंटाईन्स डे हा फेब्रुवारी महिन्यातील सर्वात मोठा चर्चेचा दिवस असतो. प्रेमाचा दिवस म्हणून ओळख असणाऱ्या व्हेलंटाईन्स डेची उत्सुकता सर्वाधिक तरुणाई मध्ये दिसून येते. म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर असणारा माणूस व्हेलंटाईन्स डे साजरा करुचं शकतो. पण व्हेलंटईन्स डे चं सेलिब्रेशन, आपल्या मनातील प्रेम व्यक्त करणं, आपला जोडीदार निवडणं अशा विविध गोष्टी यादिवशी तरुणाई करताना दिसते. किंबहुना ज्यांना जोडीदार म्हणजे प्रियकर किंवा प्रेयसी असते तेव्हा त्यांच्या बरोबर व्हेलंटान्स डे साजरं करण किंवा जी लोक सिंगल आहेत त्यांनचं काय? व्हेलंटाईन्स डे त्यांच्यासाठी नाही का किंवा त्यांनी व्हेलंटाईन्स डे सेलिब्रेटचं करु नये का? मग अशा सिंगल पण मिंगल होवू इच्छित विद्यार्थ्यांसाठी कॉलेज प्रशासनाने एक नोटीस काढला आहे. वाचायला जरी विचित्र वाटला तरी यामुळे सिंगल लोकांचा व्हेलंटाईन्स डे नक्कीचं उत्तम जाईल हे मात्र नक्की.

 

ओरिसातील जगतसिंगपूर या शहरातील एस व्ही एस कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी एक नोटीस काढला आहे ज्यात नमूद केल्या प्रमाणे कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थीनीला १४ फेब्रुवारीला किमान एक बॉयफ्रेन्ड म्हणजे प्रियकर असणं बंधनकारक आहे. सुरक्षिततेच्या पार्श्वभुमिवर हा नोटीस काढण्यात आला आहे. किंबहुना ज्या विद्यार्थीनीला बॉयफ्रेन्ड नसेल तीला शाळेत प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक मुलीला स्वतच्या बॉयफ्रेण्डचा फोटो दाखवावा लागेल. या आशयाचा नोटीस सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. (हे ही वाचा:- Man having 2 Wives: दोन बायका फजिती ऐका! ऐकी सोबत ३ दिवस तर दुसरी सोबत ३ दिवस राहण्याची अजब विवाह डील)

 

कॉलेजचं आपल्या विद्यार्थ्यांना व्हेलंटाईन्स डे संबंधीत  अशा सुचना देत असेल तर विद्यार्थ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. पण मुख्याध्यापकांद्वारे काढण्यात आलेला हा कॉलेज नोटीस बनावट म्हणजेचं फेक नोटीस आहे. तो उगाच सोशल मिडीयावर व्हायरल केला जात आहे. तरी हा फेक व्हेलंटाईन्स डे नोटीस सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.