Man having 2 Wives: दोन बायका फजिती ऐका! ऐकी सोबत ३ दिवस तर दुसरी सोबत ३ दिवस राहण्याची अजब विवाह डील
दोन्ही पत्नी सासरीच राहतील आणि पती तीन-तीन दिवस त्यांच्यासोबत असेल, असा तोडगा निघाला.
विवाह ही समाजमान्य प्रथा किंवा पध्दती आहे. सामाजातील जवळपास प्रत्येक व्यक्ती विवाह बंधानात अडकतो. गरीब असो वा श्रीमंत, खेड्यातील असो वा शहराती पण प्रत्येकाला आयुष्यात कधी तरी विवाह बंधनात अडकावं लागतं असी सामाजिक समज आहे. ते म्हणतात ना लग्न हा एक असा लाडू आहे जो खातो तो ही पश्चाताप करतो आणि जो नाही खात तो ही पश्चाताप करतो. पण एकावेळी एक लग्न टिकवणं हेच एक मोठं धाडस आहे पण उत्तर प्रदेशातील एका तरुणाने दोन विवाह केलीत ते ही दोन्ही बायकांच्या सम्मतीने. ऐकायला जरा विचित्र वाटत असलं तरी हो हे खरं आहे. मुरादाबाद शहरातील एका महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली होती की पती सासरी नेत नाही. मुरादाबाद शहरातील एका भाड्याच्या घरात आपल्याला ठेवण्यात आलं आहे. सासरी नेण्याचा आग्रह केल्यास नेण्यास नकार देतो. तक्रार दाखल केल्याच्या काही दिवसांनंतर पती अचानक बेपत्ता झाला.
त्यावेळी शोध घेतला असता तिचा पती आधीपासूनच विवाहित असल्याचं सत्य उघडकीस आलं. एवढचं नाही तर पहिल्या लग्नापासून पतीला तीन मुलं असल्याची माहिती महिलेला मिळाली. त्यानंतर महिलेने मुरादाबाद येथील एसएसपी कार्यालयात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तरुण आणि त्याच्या दोन्ही पत्नींना पोलिस स्थानकात बोलावलं आणि त्यांना समुपदेशन केंद्रात पाठवलं. (हे ही वाचा:- UP Shocker: आईला काकासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, बदनामी होण्याच्या भीतीने 10 वर्षाच्या निष्पाप मुलाचा घेतला जीव)
या समुपदेना दरम्यान महिला कल्याण केंद्रात कुटुंबाच्या उपस्थितीत एक मार्ग काढण्यात आला. ज्यानुसार दोन्ही पत्नी सासरीच राहतील आणि पती तीन-तीन दिवस त्यांच्यासोबत असेल, असा तोडगा निघाला. पहिल्या पत्नीसोबत पती सोमवार ते बुधवार राहील. तर गुरुवार ते शनिवार तो दुसऱ्या पत्नीसोबत राहील. रविवारी तो त्याच्या मर्जीनुसार दोघींपैकी कोणासोबतही राहू शकतो. तरी महिला कल्याण केंद्राचा हा निर्णय तिघांनीही मान्य केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2023 02:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

