गाझियाबाद: सॉफ्टवेअर इंजिनिअरचे कुटुंब झाले बेरोजगारीचे बळी, Whatsapp व्हिडियोवर केला गुन्हा कबुल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

गाझियाबाद: नोकरी गमावल्याच्या तणावाने पीडित पतीने गाझियाबाद मध्ये पत्नी आणि तीन मुलांची हत्या करून आपल्या गुन्ह्याची कबुली देणारा व्हिडियो व्हाट्सअप च्या फॅमिली ग्रुप वर पाठवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इंदिरापुरम परिसरात राहणाऱ्या सुमित कुमार याने आपली पत्नी अंशू बाला (वय ३२वर्ष ),मुलगा परमेश (वय ५ वर्ष) व अक्रिती आणि अरु या चार वर्षाच्या जुळ्या मुलींना झोपेच्या गोळ्या देऊन ठार केले. त्यानंतर आपण पत्नी आणि मुलांना खाण्यातून झोपेच्या गोळ्या दिल्या व नंतर धारदार चाकूने त्यांच्यावर वार केला अशी कबुली देऊन आता आपण ही आपलं आयुष्य संपवणार आहोत असं सांगणारा एक व्हिडियो आपल्या कुटुंबाला पाठवला होता.

पोलिसांच्या तपासात सुमित कुमार या ३४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला  जानेवारी मध्ये बेंगलोर येथील आपली नोकरी गमवावी लागली त्यानंतर तो मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत होता त्याच तणावात हा गुन्हा करून त्यानंतर लगेचच सुमित घरातून पळून गेल्याचं देखील सांगण्यात येतंय.  बेरोजगार तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

फरार होण्याआधी त्याने पाठवलेला हा व्हिडियो सुमितच्या बहिणीने पाहिला होता. त्यानंतर लगेचच तिने सुमितच्या भावाला त्यांच्या घरी जायाला सांगितले मात्र भाऊ घटना स्थळी पोहचल्यावर त्याने घराला कुलूप असल्याचे पहिले त्यानंतर पोलिसांना बोलावून दरवाजा तोडल्यावर आत अंशू आणि तीन मुलांची मृत शरीर मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही मृत शरीरे पोस्टमॉर्टम तपासासाठी पाठवण्यात आली असून सुमितचा तपास सुरु आहे.या गुन्ह्याविरोधात सुमितच्या भावाने केलेल्या तक्रारीनुसार सुमितवर आयपीसी ३०२ (खुन) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.