Urine Mix Juice | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पेयामध्ये स्वत:ची लघवी मिसळून (Urine Mix Juice) ती ग्राहकांना विकणाऱ्या गाझीयाबाद येथील एका ज्यूस विक्रेत्यास अटक (Ghaziabad Juice Vendor Arrested) करण्यात आली आहे. हा विक्रेता 15 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, या विक्रेत्याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्यामध्ये तो कथीतरित्या मूत्रविसर्जनातून (Urine) आलेला द्रव पदार्थ फळांच्या रसात मिसळत असे व ते मिश्रण ज्यूस (Juice) म्हणून ग्राहकांना वितरीत करत असे. अधिक माहिती देताना, एसीपी अरुण विहार भास्कर यांनी माहिती देताना शुक्रवारी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव अमिर असे आहे. प्राप्त तक्रारीनंतर पोलिसांनी अमिर याच्या रसाच्या ठेल्याला भेट दिली. तेथून त्याला अटक करण्यात आली. तसेच, प्लास्टीक कॅन आणि इतरही काही साहित्य घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले. पोलिसांना एक मूत्र भरलेली कॅनही अढळून आली. मात्र, विचारलेले प्रश्न आणि करण्यात आलेल्या चौकशीत आरोपीने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

स्थानिकांमध्ये संतापाची लाट

दरम्यान, ज्यूस विक्रेत्याचे कृत्य समजताच स्थानिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. या विक्रेत्यावर तत्काळ कारवाई करुन त्याला अटक करावी आणि कायदेशीर कारवाई करत त्याला शिक्षा दिली जावी अशी मागणी पुढे येत होती. अनेक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. ज्याला तत्काळ प्रतिसाद देत गाझियाबाद पोलिसांनी कारवाई करत, आरोपीस अटक केली. अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशा घटना उघडकीस आल्या आहेत. मुंबई येथेही एका पाणीपुरी विक्रेत्यास अटक करण्यात आली होती. सदर विक्रेता हा पाणीपुरी विक्री करताना आपल्या ठेल्यावरच एका भांड्यात मूत्रविसर्जन करत असे. तसेच, ते मूत्र पाणीपुरीसोबतच्या दिल्या जाणाऱ्या अंबट, गोड, तिखट पाण्या मिसळून ते ग्राहकांना देत असे. एका व्यक्तीने हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रित केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जनमानसात तीव्र भावना निर्माण झाली. ज्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत, संबंधितास अटक केली. (हेही वाचा, Chhattisgarh Shocker: शाळेतील तहानलेल्या विद्यार्थिनींना दिला लघवी पिण्याचा सल्ला; मुख्याध्यापकाचे निलंबन)

उघड्यावरचे पदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंताजनक

देशभरातील इतरही विविध ठिकाणी अनेकदा अशाच प्रकारच्या घटना आढळून आल्या आहेत. रस्त्यावर उघड्यावरचे पदार्थ नागरकांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही अनेकदा चिंताचा विषय ठरले आहेत. खास करुन वडापाव, पाणीपुरी अथवा पोहो, उपमा, समोसा, शिरा, इडली, डोसा, भजी, पावभाजी, पिझ्झा, बर्गर, ऑम्लेटपाव यांसारखे आणि तत्सम पदार्थ रस्त्यावर हातगाडी लावून विकले जातात. हे पदार्थ रस्त्यावरच विकले जातात. ज्यामुळे स्वच्छतेचे पालन होतेच असे नाही. हे पदार्थ नागरिकांच्या आरोग्यास बाधा आणतात. असे असले तरी, रस्त्यावरील पदार्थ खाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.