उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद (Ghaziabad ) येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका गृहनिर्माण संस्थेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या महिलेवर तिच्या सहकाऱ्यांनीच सामूहिक बलात्कार (Gang Rape News) केला आहे. वय वर्षे 19 असलेल्या सुरक्षारक्षक महिला कर्मचाऱ्याला पर्यवेक्षक आणि तिच्या दोन सहकाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीस तिने विरोध केला. त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला. तिला शारीरिक त्रास झाल्याने जीवावर बेतेल हे लक्षात आल्याने आरोपींनीच तिला रुग्णालयात दाखल केले.
धक्कादायक म्हणजे पोलिसांपासून आणि कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी तसेच घटनेची वाच्यता होऊ नये यासाठी आरोपींनी पीडितेला गाझियाबादऐवजी ग्रेटर नोएडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, पीडितेच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सोसायटीकडे धाव घेतली. तसेच, पोलिसांमध्ये जाऊन घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने तपासास सुरुवातकेली. या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक केली आहे. तर उर्वरीत दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.