एक शाळामास्तर जिगोलो (Gigolo) होण्याच्या नादात चांगलाच फसला आणि स्वत:च जाळ्यात अडकला. घटना आहे गुजरात राज्यातील अहमदाबाद (Ahmedabad) शहरातील निकोल परिसरातील. येथील एक आयुर्वेद शिक्षक (Ayurveda Teacher) आपले क्षेत्र सोडून जिगोलो होण्याचा विचार करु लागला. 29 वर्षी हा आयुर्वोद शिक्षक फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून एका महिलेला भेटला होता. फेसबुकवरील या महिलेने फिरोज तैली अशी सांगितली होती. फेसबुकवरील मैत्रीतून सुरु झालेल्या संवादात फिरोज तैली या महिलेने या शिक्षकास सांगितले होते की, 'अशा काही महिला माझ्या संपर्कात आहेत की, ज्या पैसेग देऊन सेक्स करु इच्छितात. त्यासाठी त्या एका चांगल्या जिगोलो शोधत आहेत.'
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नुसार सुमारे दीड महिन्यांपूर्वी फिरोजा ऑल गुजरात नावाच्या फेसबुक आयडीवरुन या आयुर्वेद शिक्षकास रिक्वेस्ट आली. प्रोफाईलवर एका सुंदर मुलीचा फोटो होतो. शिक्षकाने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्या महिलेने या शिक्षकाला एक फोटो पाठवला आणि जिगोलो म्हणून काम करण्यास सांगितले. फ्रीस सेक्स आणि वरुन पैसेही मिळणार म्हणून शिक्षक महोदयही तयार झाले.
पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'फिरोजा हिने शिक्षकाला सांगितले की, जिगोलो म्हणून काम करण्यासाठी त्याला एक स्वतंत्र अकाऊंट बनवावे लागेन. त्यावर 6,500 रुपये इतके शुल्कही भरण्यास सांगितले. फिरोजा तैली हिने या शिक्षकास असेही सांगितले की, त्याला काही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतील. तसेच, संपूर्ण कपडे काडून नग्न होत एक व्हिडिओही पाठवावा लागेल. शिक्षकानेही आपल्या चाचणाही केल्या आणि आफला एक पूर्ण नग्न व्हिडिओ संबंधीत महिलेला पाठवला.' (हेही वाचा, नागपूर: फेसबुकवर मैत्री करणे विद्यार्थिनीला पडले महागात, रुग्णालयात नेऊन तरुणाने केला बलात्कार)
पोलिसांनी पुढे असेही सांगितले की, या आयुर्वेद शिक्षकाने फिरोजा तैली या महिलेने सांगितल्याप्रमाणे रुषि प्रजापति नावाच्या एका बँक खात्यावर 6.500 रुपये जमाही केले. त्यानंतर त्या महिलेने शिक्षकासमोर पुन्हा नवा प्रस्ताव ठेवला. महिला म्हणाली, माझ्यावर 20 लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे ते फेडण्यासाठी 30 हजार रुपये त्वरीत द्यावे. ते जर दिले नाहीत. तर, तुझा हा नग्न व्हिडिओ तुझ्या नातेवाईक आणि मित्रांना दाखवण्याची व्यवस्था केली जाईल आणि व्हायरलही केला जाईल. पुढे या महिलेच्या मागण्या वाढतच गेल्या. महिलेच्या मागण्यांनी हा शिक्षक इतका हैराण झाला की, त्याने मी आत्महत्या करेण असे सांगितले. यावर तूझ्या आत्महत्या करण्याने काही फरक पडत नाही, असे त्या महिलेने सांगितले.
अखेर महिलेल्या वाढत्या मागण्या, आर्थिक संकट आणि बदनामीच्या धोक्याला त्रासलेल्या पीडित शिक्षकाने आपल्या मित्रांकडे मन मोकळे केले. त्यांनी ताला पोलिसांत जाण्याचा सल्ला केला. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली. पीडित शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, त्यांच्याकडे काही संशयीतांची यादी आहे परंतू, अद्यापही कोणावर थेट आरोप ठेवले नाहीत. तसेच, कोणालाही अट करण्यात आली नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.