सध्या सोशल मीडियावरील विविध माध्यमांचा वापर करत जगातील कोणत्याही व्यक्तीपर्यंत पोहतचा येते. त्यामधील एक फेसबुक असून येथे युजर्स त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल पोस्ट करत असतात. तसेच फेसबुकवरुन मैत्री करण हा सुद्धा एक पर्याय येथे दिलेला असतो. मात्र अज्ञात व्यक्तीसोबत फेसबुकवरुन मैत्री करणे हे धोक्याचे असल्याचे सांगितले जाते. तरीही काही जणांना मैत्रीच्या नावाखाली फसवणूक केली जाते. असाच एक प्रकार नागपूर (Nagpur) येथे घडला आहे. एका विद्यार्थिनीला फेसबुकवर मैत्री करणे महागात पडले आहे.
सकाळ यांनी याबाबत वृत्त दिले असून, पीडित विद्यार्थिनी ही दहावी इयत्तेत शिकते. या मुलीची गेल्या वर्षी मार्च महिन्यात एका तरुणासोबत फेसबुकवर मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर काही दिवसांनी प्रेमात झाले. दिवसेंदिवस या दोघांची जवळीक अधिक वाढू लागली होती. मात्र रिलेशन सुरु झाल्यानंतर तरुणाने प्रथम तिला घरी बोलावत तिचे लैंगिक शोषण केले, त्याचा व्हिडिओ सुद्धा तरुणाने काढला. पीडित तरुणीला काढलेल्या व्हिडिओवरुन तो तिला धमकावू लागला होता. असे या करत तिच्यावर तरुणाने गेल्या वर्षभरात अनेकदा लैंगिक शोषण केले. एवढेच नाही तर तरुणीला एका रुग्णालयात नेऊन तेथे सुद्धा तिच्यावर बलात्कार करत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढला. याबद्दल कोणाला सांगितल्यास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी त्याने तरुणीला दिली.(पुणे: दारूच्या नशेत महिलेची पार्क केलेल्या गाड्यांना मुद्दामून टक्कर मारून नासधूस; पोलिस स्थानकात कपडे उतरवण्याची भाषा Watch Video)
परंतु तरुणाच्या या प्रकाराला अखेर कंटाळून पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी तरुणाचा शोध घेत त्याला अटक केली आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून आपण पीडित तरुणीचे लैंगिक शोषण केले असल्याचे ही त्याने कबुल केले आहे.